शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमध्ये १७ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर १२१ दुकानांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 23:47 IST

नागरिकांना दिलासा; १७ लाख ५१ हजार ७१० किलो धान्याचे वाटप

- धीरज परब मीरा रोड : मीरा- भाईंदरमध्ये शिधावाटप विभागात अवघे १७ कर्मचारी आणि १२१ शिधावाटप दुकानांच्या माध्यमातून शिधावाटपाचे काम करत आहेत. आतापर्यंत शहरातील २ लाख ३८ पैकी ८७ टक्के लाभार्थ्यांना १७ लाख ५१ हजार ७१० किलो इतके तांदूळ व गहू वाटप करण्यात आले. तर मे पासून २ लाख ५२ हजार केशरी कार्डधारक लाभार्थ्यांनाही धान्य वाटप केले जाणार आहे.धान्य घेण्यासाठी शिधावाटप दुकानाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्यातच काही नगरसेवक, कार्यकर्ते यांना त्यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यास दिले नाही म्हणून फुगल्याने कांगावे करत सुटले आहेत. तर धान्य वाटपाची आकडेवारी ही आॅनलाइनही पाहता येत असून बायोमेट्रिकद्वारे धान्य वितरण होत असल्याने कांगावे बिनबुडाचे ठरत आहेत. शिधावाटप विभागात २० कर्मचारी असून त्यातील १७ कर्मचारीच सध्या कामा वर येत आहेत. काही महिला कर्मचारी तर केळवे, वसई आदी भागातून रोज दुचाकीने जीव धोक्यात घालून कामावर येत आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग त्यात १२१ शिधावाटप दुकानांमध्ये धान्य वाटपाचे नियोजन करणे अवघड जात आहे. नागरिकांकडून धान्यासाठी मोठी गर्दी केली जात असल्याने कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.अन्न सुरक्षा योजनेतील ५२ हजार शिधापत्रिका असून २ लाख ३८ हजार इतके लाभार्थी आहेत. आतापर्यंत या लाभार्थ्यांना ५ लाख ९६ हजार ६४५ किलो गहू व ४ लाख ९ हजार ९०० किलो तांदळाचे वाटप केलेले आहे. या शिवाय प्रती माणशी ५ किलोप्रमाणे ७ लाख ४५ हजार १६५ किलो तांदूळ मोफत देण्यात आला आहे. ८७ टक्के लाभार्थ्यांना आतापर्यंत धान्य वाटप झालेले असून एप्रिल संपायच्या आत यात आणखी वाढ होणार आहे. ज्यांच्या शिधावाटप पत्रिका आधारशी लिंक झालेल्या नाहीत त्यांनाही मे महिन्यापासून धान्य मिळणार असल्याचे शिधावाटप अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले.केशरी शिधापत्रिकाधारकांची संख्या ५४ हजार इतकी असून २ लाख ५२ हजार लाभार्थी आहेत. त्यांनाही मे व जूनसाठी प्रती माणशी ३ किलो गहू ८ रुपये दराने तर २ किलो तांदूळ १२ रुपये दराने दिले जाणार आहेत.सबळ पुराव्यासह तक्रारी कराव्यातसरकारकडून आवश्यक धान्यसाठा येत असून सर्वच लाभार्थ्यांना नियमाप्रमाणे धान्य मिळणार आहे. परंतु, नागरिकांनी गर्दी न करता प्रशासन व शिधावाटप दुुकानदारांना सहकार्य करावे. धान्यवाटपाबद्दल कोणत्या तक्रारी असतील, तर त्या सबळ पुराव्यांसह दिल्या जाव्यात, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.