शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मीरा - भार्इंदरमध्ये राष्ट्रवादीची वाताहत?

By admin | Updated: February 28, 2017 03:35 IST

मीरा-भार्इंदरमध्ये राष्ट्रवादीची वाताहत होण्यास सुरुवात झाली आहे.

भार्इंदर : मीरा-भार्इंदरमध्ये राष्ट्रवादीची वाताहत होण्यास सुरुवात झाली आहे. उरल्यासुरल्यांपैकी बहुतांश नगरसेवक भाजपा किंवा शिवसेनेत जाण्यासाठी वरिष्ठांच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत असल्याचे समजते. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीत गटातटांचे राजकारण असल्यानेच पक्षाला अवकळा आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. आमदारकीपासूनच पक्षांतराच्या प्रयत्नात असलेले माजी आ. गिल्बर्ट मेंडोन्सा आजही सेनेचे धनुष्यबाण हाती घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतु, याला पक्षातूनच नकार समोर येतो आहे. मेंडोन्सा यांच्या सेनेतील प्रवेशामुळे स्थानिक नेतृत्वापुढे आव्हान निर्माण होणार असल्याने त्यांच्या प्रवेशाला ‘मातोश्री’वरून हिरवा कंदील मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मेंडोन्सा सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात असल्याने सुटकेनंतरच पक्षांतराची वस्तुस्थिती समोर येणार आहे. तूर्तास ती अफवा असल्याचे सांगण्यात येत असून यावर पडदा टाकण्याचे काम समर्थकांकडून सुरू आहे. मेंडोन्सांअभावी त्यांचे समर्थक सैरभैर झाल्याने ते कधी भाजपा, तर कधी सेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचे समर्थकही पक्षांतराच्या प्रतीक्षेत असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यासाठी नाईकांच्या निर्णयाची आस त्यांना लागली आहे. २०१२ मधील पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे २९ उमेदवार निवडून आले होते. त्यातील माजी युवा जिल्हाध्यक्ष व नगरसेवक अ‍ॅड. रवी व्यास हे भाजपात गेले आहेत. पक्षाच्या आदेशाला सतत झुगारत नगरसेवक परशुराम म्हात्रे हे कागदोपत्री राष्ट्रवादीच असूनही भाजपाच्या कार्यक्रमात दिसतात. राष्ट्रवादीच्याच वंदना पाटील व अशोक तिवारी यांनीही राष्ट्रवादीच्याच बॅनरवर भाजपाच्या ‘सबका साथ सबका विकास’ या मोहिमेत सहभागी होणे पसंत केले आहे. (प्रतिनिधी)।पक्षांतराच्या केवळ अफवा : पाटीलयाबाबत, राष्ट्रवादीचे नगरसेवक व पालिकेचे माजी सभागृह नेते ध्रुवकिशोर पाटील म्हणाले, पक्षांतराचा निर्णय वरिष्ठांवरच अवलंबून असला तरी सध्या त्याच्या अफवा शहरात जोरात सुरू आहेत. असे काहीही होणार नाही.