शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरकरांची प्रतीक्षा संपणार : भुयारीमार्ग पितृपक्षानंतर खुला; मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री करणार उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 02:55 IST

पूर्व व पश्चिमेला भुयारी वाहतूकमार्ग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

राजू काळेभार्इंदर : पूर्व व पश्चिमेला भुयारी वाहतूकमार्ग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पितृपक्ष संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत लहान वाहनांसाठी हा मार्ग खुला करण्यात येईल, असे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सांगितले. ‘लोकमत’ने गेली आठ वर्षे हा प्रश्न सातत्याने लावून धरला होता. आयुक्तांसह आ. नरेंद्र मेहता, महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी सोमवारी या प्रस्तावित मार्गाची पाहणी केली.२००९ मध्ये महासभेने मंजुरी दिलेल्या भुयारी मार्गाला काही महिन्यांनंतर सुरुवात झाली. यामुळे पूर्व-पश्चिम येजा करणाºया वाहनांना उड्डाणपुलाखेरीज अन्य पर्याय उपलब्ध झाला. अनेक तांत्रिक अडचणींत सापडलेला हा भुयारी मार्ग तब्बल साडेसात वर्षांनंतर पूर्णत्वाला जात आहे. गेल्याच महिन्यात मार्गाचे काम पूर्ण झाले असले, तरी काही किरकोळ कामांचा निपटारा न झाल्याने अद्याप तो खुला करण्यात आलेला नाही. सुरुवातीला बॉक्स पुशिंग पद्धतीने हा मार्ग बांधण्याचे ठरल्याने जमिनीतील दलदल त्यासाठी अडचणीची ठरली. आयआयटी, मुंबईच्या निर्देशानंतर हा मार्ग मायक्रो टनेल ट्रेंचलेस पद्धतीने बांधण्यात आला आहे.या मार्गाच्या सर्व बाजूंना सुमारे ५०० मिलिमीटर व्यासाचे लोखंडी पाइप बसवण्यात आले असून त्यावर काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. हा मार्ग भार्इंदर खाडीपासून सुमारे ५०० मीटर असला, तरी त्यातील दलदल व पाण्याच्या स्रोतांमुळे या मार्गात पाणी झिरपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तो नियोजनशून्य ठरणार की काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.दरम्यान, या मार्गाच्या पूर्णत्वासाठी पालिकेने सुमारे १२० कोटींहून अधिक निधी खर्च केला आहे. त्यामुळे हा पालिकेच्या निधीतून बांधण्यात आलेला एकमेव महागडा प्रकल्प असल्याचे बोलले जाते. एवढा निधी खर्च करूनही हा मार्ग अद्याप वाहनांसाठी खुला करण्यात आला नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते.