शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदर पालिकेच्या नवीन नळजोडणी लोकार्पण कार्यक्रमात सेना-भाजपाचा गोंधळ

By admin | Updated: May 1, 2017 00:24 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेला राज्य सरकारने मंजुर केलेल्या ७५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठ्यातील पहिल्या टप्प्यात नवीन नळजोडणी

 राजू काळे/ऑनलाइन लोकमतभार्इंदर, दि. 1 -  मीरा-भार्इंदर महापालिकेला राज्य सरकारने मंजुर केलेल्या ७५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठ्यातील पहिल्या टप्प्यात नवीन नळजोडणी लोकार्पण कार्यक्रम पालिकेने रविवारी आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासुन सेना-भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन गोंधळ घातला. सततच्या घोषणाबाजीमुळे रंगलेल्या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीष महाजनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आले होते. परंतु, तो प्रत्यक्षात ८ वाजता सुरु झाला. दरम्यान सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कार्यक्रमात आपापल्या पक्षाचे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यात सेनेच्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याने भाजपाची संख्या कमी पडत असल्याचे दिसुन येत होते. मात्र त्यांची नारेबाजी काही केल्या थांबत नसल्याने सुरुवातीला उपमहापौर प्रवीण पाटील यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. तरी देखील कार्यकर्त्यांची घोषणाबाजी थांबत नसल्याने महापौर गीता जैन यांनी आवाहन केले. त्यालाही कार्यकर्त्यांनी दाद न दिल्याने भाजपाचे मंत्री प्रकाश मेहता, गिरीष महाजन व्यासपीठावर आल्यानंतरही दोन्ही पक्षांची जोरदार नारेबाजी सुरुच राहिली. अखेर आ. नरेंद्र मेहता यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे वारंवार आवाहन केल्यानंतर ते शांत झाले. त्यानंतर आ. मेहता यांनी केलेल्या भाषणात युती सरकारऐवजी केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्रचे सरकार असल्याचा उल्लेख करुन आपणच करुन दाखवलंच्या उल्लेखावर सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी व्यासपीठाजवळ जाण्याचा प्रयत्न केला. ते पाहुन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा हरहर मोदी, घरघर मोदीची नारेबाजी सुरु केली. अखेर आ. प्रताप सरनाईक यांना व्यासपीठावरुन खाली उतरुन सेना कार्यकर्त्यांना शांत करावे लागले. आ. मेहता यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देण्यासाठी सरनाईक यांनी केलेल्या भाषणात पाण्यासाठी आपणच विधानसभेत आवाज उठविला असुन तरीदेखील आम्ही श्रेयासाठी धडपडत नाही. सध्याचे सरकार आमच्याच पाठींब्यावर चालत असल्याची आठवण मेहता यांना करुन देत मेहता यांच्या नळजोडणी अर्ज वाटपाचा समाचार घेतला. त्यांनी नागरीकांना समाजकंटक व पाणीचोरांपासुन सावध राहण्याचा सल्ला देताच सरनाईक यांनी मेहता यांनाच टोमणा दिल्याचे गृहित धरुन भाजपाने पुन्हा गोधळ सुरु केला. अखेर सरनाईक यांनी ते विधान काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल केल्याचा खुलासा करुन गोंधळ थांबविण्याचा प्रयत्न केला. या घोषणाबाजीमुळे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होणार असले तरी त्याची सुरुवात मीरा-भार्इंदरमधुनच होईल, असे भाकीत केले. हि बाब शहरासाठी भुषणावह नसल्याची खंतही व्यक्त केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूकपुर्वीच घोषणाबाजीला सुरुवात झाल्याचा टोला दोन्ही पक्षाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना लगावला. खा. संजय राऊत यांनी भाजपाच्या हरहर मोदीच्या नारेबाजीवर सामंजसचा डोस देत देशाचे पंतप्रधान असलेले मोदी यांना खालच्या स्तरावर आणू नका, त्यांना त्यांना देशाचे राजकारण करु द्या. त्यांची सध्या मीरा-भार्इंदर मध्ये नाही तर काश्मिरमध्ये गरज असल्याचा चिमटा काढला. तीन तासांहुन अधिक काळ चाललेल्या कार्यक्रमात दोन्ही पक्षांची घोषणाबाजीच अधिक काळ सुरु होती.