शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरला ७५ दशलक्ष अतिरिक्त पाणी

By admin | Updated: April 10, 2017 05:36 IST

मीरा-भार्इंदरला राज्य सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कोट्यातून मंजूर केलेला

भार्इंदर : मीरा-भार्इंदरला राज्य सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कोट्यातून मंजूर केलेला अतिरिक्त ७५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा १५ मे पासून सुरू होणार आहे. त्यामुळे २००८ पासून नवीन नळजोडण्या बंद झाल्याने केवळ टँकरद्वारे तहान भागवणाऱ्या नवीन इमारतींतील रहिवाशांना नळाद्वारे पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी ३० एप्रिलपासून नवीन नळजोडण्यांचे अर्ज गरजूंना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी ‘लोकमत’ला दिली. शहराला २०१५ पूर्वी स्टेमद्वारे ८६ व एमआयडीसीद्वारे ३० असा एकूण ११६ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा रोज होत होता. हा पाणीपुरवठा वाढत्या शहरीकरणाला अपुरा ठरत होता. शहरात रोज नवनवीन इमारतींचे काम सुरू होत असल्याने लोकसंख्येत सतत वाढ होत आहे. शहराची लोकसंख्या आज १२ लाखांवर गेली असून होणारा पाणीपुरवठा किमान दरडोईपेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे शहराला पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी तत्कालीन आघाडी सरकारकडे सतत पाठपुरावा केला. त्याची दखल घेत तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी २०१२ मध्ये शहराला एमआयडीसी कोट्यातून १०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा मंजूर केला. त्यानंतर, सत्तेवर आलेल्या युती सरकारने या मंजूर पाण्यापैकी २०१६ मध्ये शहराच्या पाणीपुरवठ्यात तातडीने २० दशलक्ष लीटर पाण्याची वाढ केली. उर्वरित ८० दशलक्ष लीटर पाणी शहरात आणण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी आवश्यक ठरल्याने ती टाकण्याच्या कामाला राज्य सरकारने मंजुरी दिली. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांच्या पथकाने ८० टक्कयांहून अधिक काम पूर्ण केल्याने शहराला लवकरच पाणी मिळण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)युद्धपातळीवर काम सुरूसध्या युद्धपातळीवर सुरू असलेले काम मे महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण करण्यात येणार आहे. त्याची चाचणी घेतल्यानंतर १५ मे पासून शहराला प्रत्यक्षात पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे. पुरेशा पाण्याअभावी पालिकेने २००८ पासून नवीन नळजोडण्या देणे बंद केले होते. शहरातील नवीन इमारतींतील रहिवाशांना केवळ टँकरद्वारे तहान भागवावी लागत आहे. यंदा अतिरिक्त पाणीपुरवठा सुरू होणार असल्याने त्या रहिवाशांना टँकरची वाट पाहावी लागणार नाही. त्यांना नवीन नळजोडणीद्वारे पाणी मिळणार आहे.