शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरमध्ये ५७ हजार व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’?

By admin | Updated: November 25, 2015 01:31 IST

मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीत तब्बल ५८ हजार ३८७ मालमत्ता वाणिज्य वापराच्या असताना केवळ ३ टक्केच म्हणजे दीड हजार व्यावसायिकांकडून परवाना शुल्क वसूल होत आहे

धीरज परब, मीरारोडमीरा-भार्इंदर महापालिका हद्दीत तब्बल ५८ हजार ३८७ मालमत्ता वाणिज्य वापराच्या असताना केवळ ३ टक्केच म्हणजे दीड हजार व्यावसायिकांकडून परवाना शुल्क वसूल होत आहे. ते क्षेत्रफळानुसार आकारले जात असल्याने मालमत्ताकराच्या देयकातून ते वसूल करण्याच्या प्रस्तावास कर विभागाने नकार दिल्याने पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दुसरीकडे परवाना विभागात केवळ तीनच कर्मचारी असल्याने अत्यल्प वसुली होत आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी १० आॅक्टोबर २००८ च्या महासभेत परवाना शुल्काचे दर निश्चित झाले. त्यानुसार, २००८-०९ मध्ये ४३ लाख ४४ हजार, २००९-१० मध्ये १ कोटी ५१ हजार तर २०१०-११ मध्ये ५८ लाख १९ हजार रुपये इतके परवाना शुल्क वसूल केले. परंतु, इतर महापालिकांच्या तुलनेत मीरा-भार्इंदर महापालिकेचा परवाना दर जास्त असल्याने मोजक्याच व्यापाऱ्यांकडून परवानाशुल्क वसूल होते. अखेर, ३० डिसेंबर २०११ रोजीच्या महासभेने परवाना फी शुल्कात फेरबदलाचा ठराव आणून क्षेत्रफळानुसार परवाना शुल्क आकारण्यास मंजुरी दिली. क्षेत्रफळाचे टप्पे व दर ठरवण्यात आले. किमान २५० चौ.फुटांपर्यंत २५० रु. १० हजार चौ.फू.पर्यंत ६ हजार रु. व त्यापेक्षा जास्त क्षेत्रफळास ८ हजार रु. शुल्क निश्चित केले. परंतु, दर कमी करूनदेखील व्यापाऱ्यांनी परवाना शुल्क भरण्यास टाळाटाळ चालवली. परिणामी, पालिकेचे उत्पन्न आणखी घटले. सन २०१०-११ मध्ये ५८ लाख १९ हजार, २०११-१२ मध्ये ५० लाख ७१ हजार, २०१२-१३ मध्ये २२ लाख ९९ हजार, २०१३-१४ मध्ये ३१ लाख २७ हजार व २०१४-१५ मध्ये २ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असताना ५४ लाख ५५ हजार रुपये परवाना शुल्कापोटी वसूल झाले आहेत. तर, चालू आर्थिक वर्षात ३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना आॅगस्टपर्यंत फक्त १२ लाख ३१ रुपयेच परवाना शुल्क वसूल झाले आहे. परवाना विभागास स्वत:चे वाहन नसून केवळ अधिकारी व त्यांच्या हाताखाली प्रत्येकी १ लिपीक व शिपाई आहे. अशा तुटपुंज्या कर्मचारीवर्गावर परवाना शुल्क वसूल करणे अवघड झाले आहे. सध्या ६११ दुकाने, ७८० कारखाने व १४० कोंबडी-मटणाची दुकाने मिळून १५३१ व्यावसायिक आस्थापनाच परवाना शुल्क भरत आहेत. क्षेत्रफळानुसार परवाना शुल्क आकारले जात असल्याने कर विभागाच्या नोंदी असलेल्या तब्बल ५८ हजार ३८७ वाणिज्य वापराच्या मालमत्तांना कराच्या देयकातूनच परवाना शुल्क आकारणे सहज शक्य आहे. शिवाय, प्रत्येक मालमत्तेचे क्षेत्रफळ कर विभागाकडे उपलब्ध असून देयकातदेखील त्याचा समावेश असतो. आयुक्त अच्युत हांगे यांनीदेखील प्रभावी वसुली व्हावी, यासाठी मालमत्ता कराच्या देयकातून परवाना शुल्क आकारण्यास हिरवा कंदील दर्शवला होता. परंतु, सहायक आयुक्त तथा कर निर्धारक व संकलक स्वाती देशपांडे यांनी नियमाकडे बोट दाखवून मालमत्ता कराचे देयकात परवाना शुल्क समाविष्ट करण्यास नकार दिला.