कल्याण : दोन मुलांनी ८० हजार लांबवल्याची घटना कल्याणमध्ये शुक्रवारी घडली. येथील पूर्व भागात काटेमानिवली, चिंचपाडा परिसरात राहणारे स्वप्नील सुतार हे ड प्रभाग कार्यालयाजवळून जात असताना शुक्रवारी ११ वाजता १२ वर्षे वयाच्या दोन मुलांनी त्यांच्याजवळ असलेली ८० हजार रुपयांची रोकड लांबवली. सुतार यांनी ही रक्कम बँकेतून काढली होती. दोन्ही मुलांनी त्यांच्या अंगावर घाण टाकून ही रक्कम घेऊन पळ काढला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरूकेला आहे.
अल्पवयीन मुलांनी ८० हजार चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 05:51 IST