शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलाकडे २२ मोबाइल, ५ लॅपटॉप

By admin | Updated: June 1, 2017 04:57 IST

जीभ सराईतपणे आत ओढून मुका असल्याचे भासवणाऱ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलाच्या घरातून चोरीचे तब्बल २२ मोबाइल व ५ लॅपटॉप

 लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : जीभ सराईतपणे आत ओढून मुका असल्याचे भासवणाऱ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलाच्या घरातून चोरीचे तब्बल २२ मोबाइल व ५ लॅपटॉप असा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल काशिमीरा पोलिसांनी जप्त केला. आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले असून त्याच्याकडे मुका असल्याचे आंध्र प्रदेश न्यायालयाकडील बनावट प्रमाणपत्र सापडले आहे. या कारवाईच्या निमित्ताने सकाळच्या प्रहरी दार उघडे पाहून मोबाइल, लॅपटॉप, पाकीट आदी वस्तूंची चोरी करणारी टोळीच उघडकीस आली असून कोणी विचारणा केल्यास ते मुके असल्याचे सांगून स्वत:ची सुटका करून घेत. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेणकरपाडा येथील कृष्णस्थळमधील वसुधा इमारतीत राहणारे अमित जनार्दन महाजन यांचे दार सकाळी उघडे होते. सकाळी ७.४० च्या सुमारास घरातील चार्जिंगला लावलेले दोन मोबाइल चोरीला गेले. इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजवरून एका अनोळखी मुलाने घरात शिरून मोबाइल चोरल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजय मांडोळे, राजेश पानसरे, कवडे, पोलीस नायक परकाळे यांनी चोरट्याचा तपास सुरू केला. तपासादरम्यान मंगळवारी त्यांना सीसीटीव्ही फुटेजमधील वर्णनाचा १३ वर्षांचा मुलगा मुन्शी कम्पाउंड भागात सापडला. त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता तो मुका असल्याचे हातवारे करून बोलू लागला. त्याने जवळ असलेले आंध्र प्रदेश न्यायालयाकडील मुका असल्याचा दाखलासुद्धा दाखवला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तोंड उघडण्यास सांगितले असता मुलाने जीभ आत ओढून घेत तोंड उघडले. त्यात जीभ अर्धीच असल्याचे दिसले; पण पोलिसांनी त्याने बोलते करून त्याच्याकडून माहिती काढली. तो मूळचा तामिळनाडूचा असून विरारच्या फुलपाड्यामधील चाळीत आजीआजोबांसोबत राहत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन झडती घेतली असता चोरीचे तब्बल २२ मोबाइल व ५ लॅपटॉप असा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. सध्या त्याची रवानगी बालसुधारगृहात झाली आहे. चोरांची टोळीचे चार कुटुंबया फुलपाडा परिसरात पहाटे सकाळी दार उघडे पाहून मोबाइल, लॅपटॉप, पाकीट आदी चोरून नेणारी टोळीच कार्यरत आहे. येथे तीनचार कुटुंबे राहत होती. सदर मुलगा पोलिसांच्या हाती लागताच ते सर्व पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सदर टोळीने काशिमीरा, मीरा रोड, अंधेरी, पालघर आदी अनेक भागांत अशा प्रकारे चोऱ्या केल्याचे समोर आले आहे.