शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भिवंडी महानगरपालिकेचा पगार घेऊन कर्मचारी काम करतात मंत्रालयांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 13:30 IST

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेतून कोट्यावधी रूपयांचा पगार घेऊन पालिकेचे सात कर्मचारी गेल्या चार ते अकरा वर्षापासून मंत्रालयात कार्यरत असुन त्यांच्या गैरहजेरीचा पालिकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे.त्याचबरोबर त्याचबरोबर पालिकेचे आर्थिक नुकसान व नागरिकांच्या पैश्याचा गैरवापर होत असल्याचे दिसुन येत असल्याने पालिका आयुक्त योगेश म्हसे यांनी या कर्मचाºयांच्या सेवा महापालिकेत वर्ग करून ...

ठळक मुद्देपालिकेचे आर्थिक नुकसान व नागरिकांच्या पैश्याचा गैरवापरमंत्रालयातील कर्मचाºयांना आजतागायत पालिकेने दिले सुमारे १ कोटी ३७ लाख ५३ हजार ९९२ रूपये वेतनशासन सेवेत नियमीत करावे अन्यथा महानगरपालिका सेवेत रूजू करावे अशी मागणी

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेतून कोट्यावधी रूपयांचा पगार घेऊन पालिकेचे सात कर्मचारी गेल्या चार ते अकरा वर्षापासून मंत्रालयात कार्यरत असुन त्यांच्या गैरहजेरीचा पालिकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे.त्याचबरोबर त्याचबरोबर पालिकेचे आर्थिक नुकसान व नागरिकांच्या पैश्याचा गैरवापर होत असल्याचे दिसुन येत असल्याने पालिका आयुक्त योगेश म्हसे यांनी या कर्मचाºयांच्या सेवा महापालिकेत वर्ग करून घ्याव्यात ,अशी मागणी भाजपाच्या पदाधिका-याने केली आहे.उमेश काशिनाथ भोई(लिपीक),बसप्पा दुदप्पा चिकोडी(रोड कामगार),किशोर श्रीधर कदम(लिपीक),सचीन दत्तात्रय महांकाळ(लिपीक), अनिल लहिरे(लिपीक),गणपती मारूती शेषनाईक(बाग कामगार), संदिप कमलाकर पेडणेकर(सफाई कामगार) हे सात कर्मचारी पालिकेच्या आस्थापनात स्थायीपदावर काम करणारे असुन ते सध्या मंत्रालयांत काम करीत आहेत. गेल्या १ वर्षापासून ते ११ वर्षापर्यंत त्यांनी मंत्रालयांत सेवा दिली आहे. त्यांना पालिका प्रशासन २० हजार ते ३४ हजार रूपये पर्यंत मासिक पगार देत असुन आजतागायत त्यांच्यावर पालिकेने सुमारे १ कोटी ३७ लाख ५३ हजार ९९२ रूपये खर्च केले आहेत. पालिकेत काही महिन्यापासून कर्मचा-यांना मुळ पदावर काम करण्याची सक्ती केली जात आहे. शासनाचे कोणतेही धोरण नसताना केवळ राजकीय वरदहस्तामुळे मंत्रालयांत जाणे सोयीचे ठरावे या करीता त्यांना मंत्रालयांत पाठविले आहे. पालिकेतून मासिक वेतन मिळण्यासाठी सर्व कर्मचा-यांना बायोमेट्रीक मशीनवर आंगठा लावणे सक्तीचे केले आहे. मात्र प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने या सात कर्मचा-यांची सेवा केवळ मंत्रालयीन दुरध्वनी संदेशान्वये वर्ग करण्यात आली आहे. या बाबत लेखा परिक्षकांनी देखील आपला अभिप्राय नोांदविलेला नाही. अशा कर्मचा-यांना शासन सेवेत नियमीत करून पालिका आस्थापनावर नवीन नेमणूक करावी अन्यथा या सात कर्मचा-यांना माघारी बोलावून महानगरपालिका सेवेत रूजू करावे,अशी मागणी भाजपाचे जिल्हा विभागीय सरचिटणीस आनंद गद्रे यांनी आयुक्तांकडे लेखी पत्राव्दारे केली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCorruptionभ्रष्टाचार