शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

२७ गाव कर्मचा-यांना मिळणार किमान वेतन, महासभेत प्रस्ताव, वर्षाला ९ कोटी १३ लाखांचा बोजा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 06:21 IST

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत समावेश झालेल्या २७ गावांतील कर्मचा-यांना किमान वेतन मिळावे ही मागणी अंमलात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून यासंदर्भातला प्रस्ताव बुधवारी पार पडणाºया महासभेत दाखल करण्यात आला आहे. ४९४ कर्मचा-यांना या निर्णयाचा लाभ होणार असून महापालिकेच्या तिजोरीवर वर्षाकाठी ९ कोटी १३ लाख ८६ हजार २४० ...

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत समावेश झालेल्या २७ गावांतील कर्मचा-यांना किमान वेतन मिळावे ही मागणी अंमलात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून यासंदर्भातला प्रस्ताव बुधवारी पार पडणाºया महासभेत दाखल करण्यात आला आहे. ४९४ कर्मचा-यांना या निर्णयाचा लाभ होणार असून महापालिकेच्या तिजोरीवर वर्षाकाठी ९ कोटी १३ लाख ८६ हजार २४० रूपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.दि. १ जून २०१५ रोजी २७ गावांचा केडीएमसीत पुन्हा समावेश करण्यात आला. येथील कर्मचाºयांना प्रथम ६ महिन्यांच्या कालावधीसाठी महापालिकेच्या सेवेत रूजू करून घेण्यात आले. त्यानंतर वेळोवेळी त्यांना मुदतवाढ देण्यात आली. कायद्यानुसार त्यांना किमान वेतन मिळावे ही मागणी स्थानिक लोक प्रतिनिधींकडून वारंवार होत होती. कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी अलीकडेच आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेऊन किमान वेतनाच्या मुद्याकडे लक्ष वेधले होते. तेव्हा २७ गावातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणाºया आणि आता महानगरपालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या कर्मचाºयांना शासन निर्णयानुसार देय असणारे किमान वेतन लागू होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. महापालिका प्रशासनाने यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता बुधवारी होणाºया महासभेत प्रस्ताव दाखल केला आहे.या निर्णयाचा लाभ मिळणाºया ४९९ कर्मचाºयांपैकी ४ जण हे किमान वेतनापेक्षा जास्त वेतन असलेले असून १ कर्मचारी मृत झालेला आहे. त्यामुळे किमान वेतन देय असलेल्या कर्मचाºयांची संख्या ४९४ इतकी आहे. त्यांची प्रभाग निहाय आकडेवारी पाहता ‘आय’ प्रभागक्षेत्रात २२७ तर ‘ई’प्रभागात २६७ कर्मचारी आहेत. यात १५८ कुशल, अर्धकुशल १२ तसेच ३२४ कर्मचारी हे अकुशल आहेत. २७ गावांमध्ये ग्रामपंचायतींची संख्या २६ इतकी होती. परंतु गावांची संख्या २७ आहे. भोपर आणि देसलेपाडा या दोन गावांची एकच ग्रामपंचायत होती. ज्या कर्मचाºयांना किमान वेतन देय आहे त्यांना ३ हजार ८० इतका विशेष भत्ता लागू आहे.मोजावे लागणार ७६ लाख १५ हजार ५२०किमान वेतनाप्रमाणे आता कुशल कर्मचाºयांना १७ हजार ८० रूपये, अर्धकुशल कर्मचाºयांना १६ हजार ८० तर अकुशल कर्मचाºयांना १४ हजार ५८० रूपये वेतन मिळणार आहे. कुशल कर्मचाºयांवर महिन्याकाठी २६ लाख ९८ हजार ६४०, अर्धकुशल कर्मचाºयांसाठी १ लाख ९२ हजार ९६० तसेच अकुशल कर्मचाºयांवर ४७ लाख २३ हजार ९२० रूपये असे एकूण ७६ लाख १५ हजार ५२० रूपये खर्च होणार आहेत.