शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांना मिळणार किमान वेतनाच्या फरकाची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 19:50 IST

ठाणे महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची आज खऱ्या अर्थाने दिवाळी सुरु झाली आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या त्रुटी दूर केल्या जाणार आहेत. तसेच टिएमटीच्या ६१३ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या संयुक्त बैठकीत महापौर मीनाक्षी शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला.

ठळक मुद्दे७ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार लाभटिएमटीचे ६१३ कर्मचारी होणार कायम

ठाणे - दिवाळी सणाची लगबग सुरू असतानाच शुक्र वारी महापालिका आयुक्तसंजीव जयस्वाल आणि महापौर मीनाक्षी शिंदे आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या कामगारांच्या सर्व न्याय मागण्या मान्य करण्यात आल्या. कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार फरकाची रक्कम देण्याचा, ६ व्या वेतन आयोगातील त्रुुटी दूर करण्याचा, आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा, वेतन त्रुटी दूर करण्याचा, ६ व्या वेतन आयोगानुसार विविध भत्ते लागू करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय यावेळी घेण्यात आले. तसेच परिवहन सेवेच्या ६१३ कर्मचाºयांना १ महिन्यात नियमित करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेवर तिजोरीवर १०० कोटींचा बोजा पडणार आहे.                        गेल्या अनेक दिवसांपासून स्थायी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सातत्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे सातत्याने मागणी होत होती. तसेच महासभेत सुध्दा नगरसेवक अशोक वैती आणि नजीब मुल्ला यांनी याबाबत वारंवार पाठपुरावा सुरु ठेवला होता. दरम्यान शुक्र वारी झालेल्या संयुक्त बैठकीत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे कंत्राटी पद्धतीने काम करणारे २०६ कुशल आणि १५४६ अकुशल कामगार, आरोग्य विभागाकडील २३२ कर्मचारी त्याचप्रमाणे शिक्षण विभाग, उद्यान विभाग, पाणी पुरवठा विभाग, मलिन:सारण विभाग या ठिकाणी काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी २०१५ ते ३१ आॉक्टोबर २०१६ या कालावधीतील किमान वेतन कायद्यानुसार मिळणारी फरकाची रक्कम पाच हप्त्यात देण्याचा निर्णय घेतला. यातील पहिला हप्ता डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागामध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्र म आणि महिला व बाल कल्याण आरोग्य कार्यक्र मातंर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सरळसेवा नियुक्तीप्रमाणे देय असलेल्या पगाराच्या ६० टक्के किंवा किमान वेतन कायद्यानुसार जे जास्त असेल ते वेतन देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पे मधील त्रुटी दूर करून त्यांना सुधारीत नियमानुसार वेतन निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगितले. याचा जवळपास ७ हजार कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. दरम्यान, निवृत्त न्यायमुर्ती मारूती गायकवाड यांच्या वेतन त्रुटी समितीच्या अहवालानुसार तांत्रिक पदांची वेतन श्रेणी राज्य शासनाच्या धर्तीवर सुधारित करणार, तसेच शासन निर्णयानुसार आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. तसेच अग्निशमन दलातील कर्मचाºयांना त्यांची जबाबदारी विचारात घेवून उच्च वेतनश्रेणीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.या महत्वाच्या निर्णयाबोरबरच कर्मचाऱ्यांना विशेष पुरक भत्ता, वैद्यकीय भत्ता, वाहतूक भत्ता, अपंग महिला कर्मचारी विशेष भत्ता, निर्सग भत्ता देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. ठाणे परिवहन सेवेतील ६१३ अस्थायी कर्मचाऱ्यांना एका महिन्यात नियमित करण्याचा महत्वाचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त