शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतही एमआयएमचा उमेदवार

By admin | Updated: April 25, 2017 00:00 IST

मुंबई, ठाणे व कल्याणपाठोपाठ एमआयएम पक्ष आता भिवंडीतही आपले नशीब आजमावणार आहे. पक्षाच्या मुख्य कमिटीने भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

भिवंडी : मुंबई, ठाणे व कल्याणपाठोपाठ एमआयएम पक्ष आता भिवंडीतही आपले नशीब आजमावणार आहे. पक्षाच्या मुख्य कमिटीने भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.आॅल इंडिया मजलिस इत्तेहादूल मुसलमीन म्हणजेच एमआयएम प्रथमच महानगरपालिकेची निवडणूक लढवत असून त्यानिमित्ताने २० दिवसांपूर्वी अशोका हॉटेल व रविवारी रिजंट हॉटेलच्या कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंग आयोजिली होती. काही दिवसांपूर्वी एमआयएमची संपूर्ण शहर कार्यकारिणी समाजवादी पार्टीत विलीन झाली होती. त्यामुळे राज्यातील पक्ष नेत्यांसह स्थानिक कार्यकर्त्यांनी धसका घेतला होता. मात्र, पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मुंबई विभागातील कार्यकर्त्यांवर जबाबदारी टाकल्याने पक्षउभारणीस गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले होते. रविवारी झालेल्या बैठकीत मुंब्रा शहराध्यक्ष रौफ लाला, नगरसेवक गुंजन बरकतुल्ला खान, केडीएमसीचे नगरसेवक अय्याज मौलवी, शादाब उस्मानी, अबरार खान, अ‍ॅड. सुकी शेख, रमेश आन्ना यांची निवडणुकीसाठी मुख्य कमिटी जाहीर करण्यात आली. शहरातील निवडणुकीसंदर्भात होणारे निर्णय ही कमिटी घेणार असून येत्या शनिवारी पक्षाध्यक्ष ओवेसी हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती कमिटी सदस्य शादाब उस्मानी यांनी दिली. वास्तविक, एमआयएमने मुंबईत २, मुंब्रा २ व केडीएमसीमध्ये २ नगरसेवक निवडून आणले होते. तर, राज्यात एमआयएमचे १३५ नगरसेवक विविध नगरपालिका व महानगरपालिकेत आहेत. निवडणुकीत पक्षामार्फत उमेदवारी मिळवण्यासाठी लोक येत आहेत. परंतु, इतर मनपाप्रमाणे जेथे मुस्लिम व दलित वस्ती आहे, तेथे उमेदवारांना प्राधान्य देणार आहे. तसेच जागादेखील कमी लढवणार आहेत. निवडणुकीची रणनीती मुख्य कार्यकारिणीने तयार केली असून त्यानुसार पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)