शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयएम’चा फटका युतीला

By admin | Updated: July 16, 2016 01:52 IST

आयकर विवरणपत्राची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत सादर न केल्याने निवडणुक आयोगाने ओवैसी बंधूंच्या आॅल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाची नोंदणी रद्द केली आहे

ठाणे : आयकर विवरणपत्राची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत सादर न केल्याने निवडणुक आयोगाने ओवैसी बंधूंच्या आॅल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाची नोंदणी रद्द केली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेत एमआयएमच्या आड मतांची गोळा बेरीज जुळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेना, भाजपला याचा मोठा फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तर दुसरीकडे याचा फायदा उठविण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीने मुस्लिमबहुल वस्तीत पुन्हा मोर्चे बांधणी सुरु केली आहे.एमआयएम ठाण्यातील काही मुस्लिमबहुल वस्तीत चमत्कार घडवू शकतो अशी चर्चा होती. त्यानुसार कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी या पक्षात जाहीर प्रवेशही केला होता. मुंब्य्रात तर या पक्षाचा चांगलाच बोलबाला सुरु झाला होता. तसेच, समाजवादीमधील देखील काही महत्वाची मंडळी या पक्षाच्या संपर्कात होती. एमआयएमच्या या वाढत्या जोरावरच मुब्ंय्रात शिवसेनेने अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली होती. एमआयएम हे भाजपाचेच पिल्लु असल्याची चर्चाही रंगली होती. एमआयएम रिंगणात नसल्याचा फटका बसेल ही बाब शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनीही मान्य केली आहे. ही नोंदणी रद्द केल्याचा फायदा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीलाच अधिक होईल असा त्यांचा दावा आहे. एमआयएम हे भाजपाचे पिल्लू असल्याची बाब मात्र त्यांनी अमान्य केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपा सहानभुती मिळविण्यासाठी एमआयएमची मान्यता पुन्हा मिळवून देईल, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. तर कॉंग्रेसने देखील भाजपावर याच मुद्यावरुन आगपाखड केली आहे.