शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

तोट्याअभावी लाखो लीटर पाणी जातेय गटारात

By admin | Updated: May 3, 2017 05:31 IST

शहरात तोटयाविना नळातून लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. काही प्रभागात नगरसेवकांनी स्वखर्चाने नळाच्या तोटया लावल्या असून

उल्हासनगर : शहरात तोटयाविना नळातून लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. काही प्रभागात नगरसेवकांनी स्वखर्चाने नळाच्या तोटया लावल्या असून पाणीटंचाईच्या निषेधार्थ भारिपाच्या नगरसेविका कविता बागूल यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा पालिका आयुक्तांना दिला आहे. पालिकेचा पाणी पुरवठा विभाग नसल्यातच जमा असल्याची टीका होत आहे.उल्हासनगरचे पाणीटंचाईचे ग्रहण सुटता सुटत नाही. पालिकेने पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी एमआयडीसीकडे वाढीव पाण्याची मागणी केली. तर दुसरीकडे नियोजनाअभावी लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. शहरात ३०० कोटीच्या पाणीपुरवठा योजनेतंर्गत नवीन जलवाहिन्या टाकून प्रत्येक घरी, दुकान व कारखान्यांना निळया रंगाच्या पाईपमधून नळजोडण्या दिल्या आहेत. पालिकेने निळया रंगाच्या पाईपमधून नळजोडणी दिल्यावर जुन्या नळजोडण्या खंडीत करणे गरजे होते. मात्र तसे पालिकेने केले नाही. जुन्या व नवीन जलवाहिन्यांतून पुरवठा करीत आहे. नागरिक दोघांचाही उपयोग करीत आहेत. तर काही नागरिकांनी जुन्या नळजोडणीतून पाणीपुरवठा होत असल्याने नवीन जोडण्या घेतल्या नाहीत. अशा हजारो बेवारस तोटयाविना असलेल्या निळया रंगाच्या पाईपमधून लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. तत्कालिन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दौरा केला असता हा प्रकार उघड झाला. त्यांनी अशा नळजोडण्या बंद करण्याच्या अथवा त्यांना तोटया बसविण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्यापही विभागाने तोटया लावलेल्या नाहीत. अथवा नळजोडण्या खंडित केलेल्या नाहीत. (प्रतिनिधी)स्वखर्चातून बसविल्या तोट्या प्रभाग क्रमांक १८ च्या भारिपच्या नगरसेविका कविता बागूल यांनी पती व समाजसेवक सुधीर बागूल यांच्यासह कार्यकर्त्यांच्या मदतीने सुभाष टेकडी परिसरातील निळया पाईपला तोटया बसविल्या आहेत. तसेच प्रभाग ११ च्या नगरसेविका कविता पंजाबी, लाल पंजाबी यांनीही नळांना तोटया बसविल्या. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाचून, परिसरात पाणीसंकट कमी झाल्याचे पंजाबी यांनी सांगितले. आरोग्याला धोका : सुभाष टेकडी परिसरात दिवसाआड पाणी पुरवठा होण्याऐवजी आठवडयाला दोन दिवस पाणीपुरवठा होतो. तसेच पाणी सोडण्याची वेळ वेळोवेळी बदलत असल्याने महिला त्रस्त झाल्या आहेत. अपुऱ्या पाणी पुरवठयामुळे महिला पिण्यासाठी हातपंपाच्या पाण्याचा उपयोग करीत असल्याने, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.