शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्र स्थलांतरित करा!

By admin | Updated: May 12, 2016 01:57 IST

प्रभाग समिती एकच्या इमारतीत असलेले आरोग्य केंद्र, वैद्यकीय प्रयोगशाळा, मध्यवर्ती औषध भांडार त्वरित पंडित भिमसेन जोशी रुग्णालयात स्थलांतरित करा

भार्इंदर : प्रभाग समिती एकच्या इमारतीत असलेले आरोग्य केंद्र, वैद्यकीय प्रयोगशाळा, मध्यवर्ती औषध भांडार त्वरित पंडित भिमसेन जोशी रुग्णालयात स्थलांतरित करा, रिक्त होणारी जागा प्रभागांतर्गतील कर्मचाऱ्यांना द्यावी, अशी विनंती नवनियुक्त सभापती आसिफ शेख यांनी नुकतीच आयुक्त अच्युत हांगे यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत हांगे यांनी ही कार्यालये त्वरित हलविण्याचा आदेश दिला. त्यामुळे वैद्यकीय विभागात नाराजी आहे.ग्रामपंचायतीच्या काळात मुख्यालय असलेल्या इमारतीत सध्या प्रभाग समिती एकचे कार्यालय आहे. नगरपालिकेच्या काळापासून तेथे आरोग्य केंद्र, मध्यवर्ती औषध भांडार, क्षयरोग विभाग आहे. येथील मध्यवर्ती औषध भांडारातून सध्या पालिकेच्या १० आरोग्य केंद्रांसह स्व. इंदिरा गांधी वजोशी रुग्णालयांना औषधांचा पुरवठा केला जातो. जानेवारीत सुरू झालेल्या जोशी रुग्णालयाच्या बेसमेंटला औषधांचा साठा करण्यासाठी व्यवस्था आहे. त्यासोबतच तेथे लॉन्ड्री, हाऊसकिपिंगसाठी जागा देण्यात आली आहे. मात्र, इतर विभागांसाठी रुग्णालयाच्या आराखड्यात तजवीज केलेली नाही. त्यातच हे चार मजली रुग्णालय सध्या दोन मजल्यावरच स्थिरावले असून उर्वरित दोन मजले अजूनही मोकळे आहेत. (वार्ताहर)प्रभाग कार्यालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील छताचे प्लॅस्टर काही महिन्यांपूर्वी कोसळले होते. त्यामुळे त्याच्या डागडुजीसाठी तेथील कर्मचाऱ्यांना स्थानिक संस्था कर विभागाच्या मुख्य कार्यालयात हलविण्यात आले होते. त्यांना पुन्हा प्रभाग कार्यालयात स्थलांतरित करण्यासाठी शेख यांनी हांगे यांना विनंती केली होती. त्यानुसार हांगे यांनी ७ मे रोजी आदेश दिला आहे. याबाबत शेख म्हणाले, की प्रभाग कार्यालयातील कर्मचारी एकाच ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यांना पुरेशी जागा मिळावी, यासाठीच हांगे यांना विनंती केली होती.