शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे एमआयडीसीचे नवीन भूखंड केवळ उद्योजकांनाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 02:46 IST

एमआयडीसीतर्फे निवासी भागातील नोंदणीकृत रहिवासी संघटनांना काही वर्षांपूर्वी वृक्षलागवड तसेच बगिचांसाठी राखीव असलेले भूखंड विशिष्ट कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आले होते.

डोंबिवली : एमआयडीसीतर्फे निवासी भागातील नोंदणीकृत रहिवासी संघटनांना काही वर्षांपूर्वी वृक्षलागवड तसेच बगिचांसाठी राखीव असलेले भूखंड विशिष्ट कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. पण, लाखो रुपये खर्चून विकसित केलेल्या या भूखंडांवर संघटनांना पाणी सोडावे लागणार आहे. भूखंडांच्या भाडेकराराचा कालावधी संपल्यानंतर नूतनीकरण केले जाणार नाही, तसेच मंडळ आणि संस्थांना नवीन भूखंडवाटप करण्याचे धोरण नाही. यापुढे केवळ उद्योजकांनाच नवीन भूखंडवाटप करण्यात येणार असल्याचे एमआयडीसीने जाहीर केल्याने संबंधित संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.राज्य सरकारच्या नगर नियोजन कायद्यानुसार अंदाजे १० टक्के भूखंड वृक्षलागवड आणि बगिचा यासाठी मोकळे ठेवावे लागतात. त्यानुसार, एमआयडीसीने काही भूखंड मोकळी जागा (ओपन स्पेस) या नावाखाली ठेवले आहेत. एमआयडीसीमधील प्रदूषण रोखणे आणि बेकायदा बांधकामांपासून सरकारी भूखंडांचे संरक्षण करणे, हा यामागचा उद्देश आहे. त्यानुसार, काही वर्षांपूर्वी असे काही मोकळे भूखंड नोंदणीकृत संघटनांना देण्यात आले होते. पाच ते दहा वर्षे अशा ठरावीक कालावधीसाठी दिलेल्या या भूखंडांच्या कराराचा कालावधी संपताच ते पुन्हा ताब्यात घेण्याची प्रक्रिया एमआयडीसीने डिसेंबरपासून सुरू केली आहे. तसेच या कराराचे नूतनीकरण केले जाणार नाही, असेही स्पष्ट केले आहे. याप्रकरणी डोंबिवली वेल्फेअर असोसिएशन, सुदर्शननगर निवासी संघ आणि मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन, नवचैतन्य रहिवासी सेवा संस्था यांना पत्र पाठवून कळवण्यात आले आहे. डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने एमआयडीसीकडे नवीन भूखंड मिळावा, अशी मागणी केली होती. त्यांनाही नकार देण्यात आला आहे. त्यांनाही पत्र पाठवून उद्योजकांची संघटना व उद्योजक यांना वृक्षारोपण, बागबगिचा, सुशोभीकरणासाठी जागेचे वाटप करता येते. मंडळ, संस्थेस भूखंडवाटप करण्याचे महामंडळाचे धोरण नसल्याचे एमआयडीसीने स्पष्ट केले आहे.लाखोंच्या खर्चावर पाणी : काही वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावर मिळालेल्या भूखंडांवर लाखो रुपये खर्चून उद्याने साकारली गेली आहेत. उद्यानांबरोबरच जॉगिंग ट्रॅक, ओपन जिमची सुविधा याठिकाणी असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात. मोकळ्या भूखंडांवर मातीचा भराव घालणे, सपाटीकरण करणे, कुंपण घालणे व त्यांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करणे आदी खर्च रहिवासी संघटनांनी केला आहे. भाडेकराराची मुदत वाढवून देण्याच्या रहिवासी संघटनांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून यापुढे भूखंडांच्या कराराचे नूतनीकरण करता येणार नाही, तसेच भूखंडांचे नव्याने वाटप करता येणार नाही, ही एमआयडीसीने घेतलेली भूमिका न पटणारी आहे, अशी प्रतिक्रिया डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी दिली.

टॅग्स :dombivaliडोंबिवली