शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

म्हात्रे, सवरांचा आदेश देवरांनी धुडकावला?

By admin | Updated: September 26, 2016 02:04 IST

राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले अनुसुचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख व आमदार रूपेश म्हात्रे यांनी आश्रमशाळा तपासणी दौऱ्या दरम्यान

हुसेन मेमन, जव्हारराज्यमंत्र्याचा दर्जा असलेले अनुसुचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख व आमदार रूपेश म्हात्रे यांनी आश्रमशाळा तपासणी दौऱ्या दरम्यान भांड्यांची झालेली अवस्था व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन उन्हाळी अधिवेशन काळात आदिवासी विकास सचिव राम गोपाल देवरा यांची दोनदा भेट घेऊन निविदा मंजुरीनुसार भांडी व सामग्री खरेदी करण्याचे पत्रही दिले होते तसेच आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनीही संमती दिली होती. परंतु देवरा यांनी काहीही कारवाई केली नाही. मार्च महिन्यात त्यांनी म्हात्रे यांना आपण तातडीने भांडी खरेदी करू असे जे आश्वासन दिले होते. त्याचाही त्यांना सोयीस्कर विसर पडला. त्यामुळे शाळा सुुरू होऊन पाच महिने उलटूनही खरेदी पूर्ण केली गेलेली नाही, याचे म्हात्रे यांनी पुन्हा एका पत्राद्वारे स्मरण करून दिले तरी देवरांनी काहीही कारवाई केली नाही. पत्राचीही दखल न घेतल्यामुळे आमदार यांनी पावसाळी अधिवेशन दरम्यान पुन्हा देवरा यांच्या दालनात जाऊन त्यांना आठवण करून दिली. मात्र त्यावेळी देवरा यांनी म्हात्रेंच्या विनंतीला न जुमानता आता नव्याने निविदा काढू असे सांगितले. यावर अध्यक्षांनी रोष व्यक्त करून गेल्या दोन वर्षापासून ई-निविदा काढूनही खरेदी का केली जात नाही? असा सवाल केला असता त्याचे उत्तर देवरांकडे नव्हते. त्यामुळे शेवटी म्हात्रेंनी आता मी मुख्यमंत्र्यांना भेटून वास्तव काय ते सांगणार असल्याचे सांगितले. तरीही देवरा ढिम्मच राहिले.देवरा यांना आपल्या मर्जीतील ठेकेदार हवा असल्याची चर्चा आहे. त्यांच्यातून व आदिवासी विकासमंत्री सवरा यांच्यातून विस्तव जात नाही. ठेकेदार तुमचा की आमचा? या वादात संपूर्ण खात्याचा कारभार ठप्प झाला आहे. आदिवासींच्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्या ऐवजी भलत्याच खरेदीला सध्या प्राधान्य दिले जाते आहे. सन २०१३-१४ मध्ये या भांड्यांची व साहित्याची खरेदी करणे अपेक्षित होते, ती सवरा यांनी सांगूनही झालीच नाही. आता तर देवरा नव्याने निविदा मागवू असे सांगत आहेत. त्यामुळे या खात्याचा कारभार सवरांऐवजी देवराच चालवित असल्याचे स्पष्ट होते. मंत्रालयात आणि आदिवासी विकासखात्यात अशी चर्चा आहे की, आदिवासी विकास मध्ये सवरा यांनी इतके घोटाळे केले आहेत की त्याला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या खात्याच्या सचिवपदी देवरांची प्राणप्रतिष्ठा केली आहे. सवरांचा कोणताही आर्थिक निर्णय छाननी शिवाय अमलात आणायचा नाही असा कानमंत्र त्यांना दिला आहे. त्यामुळेच मंत्री सवरा अथवा त्यांच्या खात्याच्या समितीचे अध्यक्ष म्हात्रे काहीही म्हणोत मुख्यमंत्र्यांचे ओके मिळेतो, आदिवासी विकासखात्यात इकडची काडी तिकडे होत नाही. त्यामुळे आता या खरेदीच्या विलंबाचा ठपका मुख्यमंत्र्यांवर जनता ठेवत आहे. संबंधित ठेकेदार म्हणतात, किती वेळा निविदा काढणार ? सन २०१५-१६ मध्ये झालेल्या निविदांच्या मंजूरी मिळावी अन्यथा आम्हाला नाईलाजस्तव न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागणार आहे.