शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या लॉटरीमध्ये पोलीस अन् चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना २० टक्के राखीव कोटा - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 05:00 IST

ग्रीन झोनमध्ये पंतप्रधान आवास योजना

- अजित मांडकेठाणे : म्हाडा आणि एसआरए योजनेचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने आता महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, म्हाडा किंवा एसआरएचे प्लान मंजूर करण्यासाठी संबंधित प्राधिकरणाला यापुढे महापालिकेची मंजुरी घ्यावी लागणार नाही. या दोन्ही प्राधिकरणांना प्लानमंजुरीचे अधिकार दिले जाणार आहेत.याशिवाय, म्हाडामधील घरे आता यापुढे पोलीस आणि शासकीय कार्यालयांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० टक्के राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खास लोकमतशी बोलताना दिली.शुक्रवारी सायंकाळी उशिरा जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दालनात महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत या गोष्टींना प्राधान्य देण्याचे त्यांनी निश्चित केले. या बैठकीला एसआरएचे आणि म्हाडाचे अधिकारीदेखील उपस्थित होते.यापूर्वी म्हाडाची योजना राबविली जात असताना एखाद्या इमारतीचा विकास किंवा दोन ते तीन इमारतींचा विकास केला जात होता. परंतु, त्यामुळे पूर्ण परिसराचा विकास होत नव्हता. मात्र, आता नव्या धोरणानुसार म्हाडाची एकात्मिक विकासाची योजना राबविली जाणार आहे, जेणेकरून त्या संपूर्ण परिसराचा विकास यातून साध्य होणार आहे. ठाण्यातील एसआरएची व्याप्ती वाढविणारमुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील एसआरए योजनेसाठीची व्याप्ती वाढविली जाणार असून चार एफएसआय व ३०० चौरस फुटांचे घर देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यावर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.तर, एसआरएलादेखील यापुढे आपले प्लान मंजूर करण्यासाठी महापालिकेकडे जावे लागणार नसल्याचे त्यांनी सांगितले.ग्रीन झोनमध्ये पंतप्रधान आवास योजनाम्हाडा हे स्वतंत्र प्राधिकरण असल्याने यापुढे एखाद्या २० ते २५ एकर ग्रीन झोनवर पंतप्रधान आवास योजना राबविण्याची तयारी दाखविली, तर त्याचाही विचार केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी एक एफएसआय दिला जाणार आहे. तर, यापुढे म्हाडाच्या लॉटरी सिस्टीममध्ये पोलीस आणि शासकीय सेवेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांसाठी प्रत्येकी १० टक्के सदनिका राखीव ठेवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्याच्या आजूबाजूला अशा स्वरूपाचा मोठा भूखंड उपलब्ध व्हावा, यासाठी संबंधित महापालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत. याठिकाणी परवडणारी घरे बांधण्याचा विचार आहे.

टॅग्स :mhadaम्हाडा