शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
2
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
3
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
4
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
5
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
7
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
8
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
12
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
13
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
14
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
15
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
16
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
17
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
18
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
19
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
20
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे

लॉकडाऊनमध्ये १४० जणांच्या एका कुटुंबाने दिला एकतेचा संदेश, रोज नवनवीन स्पर्धांचे सोशल मिडियाच्या माध्यमातून आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 16:55 IST

लॉकडाऊनच्या काळात जनजागृती बरोबरच १४० जणांच्या एका कुटुंबाने एकोप्याचे दर्शन घडविले आहे.शासनाने सांगितल्या प्रमाणे घरात राहून कोरोनाला हरविण्यासाठी या कुटुंबाने विविध स्पर्धांचेही आयोजन केले होते.

अजित मांडकेठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमध्येही अनेकांनी आपले वेगळेपण जपले आहे. असेच काहीसे वेगळेपण आणि घरात राहून कोरोनाला हरविण्याचा निर्धार करीत १४० जणांच्या एका कुटुंबाने एकोप्याबरोबरच एकतेचा संदेश देण्याचे कामही केले आहे. ठाणे,मुंबई, अंबरनाथ, बडोदा आदींसह इतर ठिकाणावरील हे कुटुंबांतील सदस्य एकत्र येत असून रोज नवनवीन स्पर्धांचे आयोजन करीत आहेत. त्यातूनच ते घरात राहून कोरोनावरही मात करीत आहेत.              लॉकडाऊनचा कालावधी लवकर संपविला जावा अशी मागणी अनेक स्तरातून अनेक नागरीकांकडून केली जात आहे. त्यात लॉकडाऊनचा कालावधी कसा घालवावा असा प्रश्नही अनेकांना सतावत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लघन करुन अनेक जण रस्त्यांवर फिरतांना दिसत आहे. परंतु ठाण्यात असेही एक कुटुंब आहे, जे या लॉकडाऊनचा सदुपोयग करतांना दिसत आहे. घोडबंदर भागातील ब्रम्हाड येथे वास्तव्यास असलेल्या साक्षी ठाकूर यांनी त्यांच्या कुटुंबाबत ही माहिती दिली आहे. त्यांच्या या कुुटंबात १४० सदस्य आहेत. कोणी ठाण्यात, अंबरनाथ, बदलापुर, मुंबई, घाटकोपर, बडोदा आदी ठिकाणी हे सर्व सदस्य वास्तव्यास आहेत. परंतु या लॉकडाऊनच्या काळात हे सर्व सदस्य आपला वेग अगदी मस्त मजेत घालवत असल्याचे त्यांनी सांगितले. या लॉकडाऊनच्या कालावधीत रोज वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये केशबुशा, बो बांधण्याची स्पर्धा, वेशभुषा, गाण्यांच्या, गप्पांच्या, गोष्टी आदी स्पर्धांबरोबरच शुक्रवारी या कुटुंबांतील प्रत्येक पुरषाने घरातील महिलांसाठी जेवण तयार करायचे असे प्लनींग झाले. त्यानुसार पुरुष मंडळींनी देखील यात हिरीरीणे सहभाग घेतला, कोणी चपात्या केल्या, कोणी व्हेज, तर कोणी नॉनव्हेजच्या विविध डीश तयार केल्या. या स्पर्धांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाला घरात राहूनच कोरोनाला हरवा असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. याचाच एक भाग म्हणून चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून स्टे होम सेफ होम, घरी रहा सुरक्षित रहा अशा आशयाचे मेसेज तयार करुन जनजागृती करण्याचा प्रयत्नही या मंडळींनी केला आहे. कोरानावर घरी राहून मात करता येऊ शकते हेच सांगण्याचा आमचा प्रयत्न असून या निमित्ताने उलट कुटुंबातील सदस्यांप्रती असलेली भावना आणखी दृढ झाली असून, एकोपा आणि एकतेचा संदेशच या कुटुंबांने दिला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या