शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

परिवहनचा अर्थसंकल्प विलीन करा; सभापतींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:13 IST

स्थायी समितीला शिलकी अर्थसंकल्प सादर

कल्याण : आर्थिक सक्षमतेसाठी शिक्षण मंडळाप्रमाणे परिवहनचा अर्थसंकल्पही केडीएमसीच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यासाठी स्थायी समिती, महापालिकेचे पदाधिकारी आणि आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे मत केडीएमटीचे सभापती मनोज चौधरी यांनी शुक्रवारी मांडले. तसेच सार्वजनिक स्पर्धेत परिवहनचे अस्तित्व टिकविण्यासाठी महापालिकेकडून आर्थिक पाठबळ मिळावे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.परिवहनचा २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाचा ९८ कोटी ७४ लाख रुपये जमा व ९६ कोटी ६४ लाख रुपये खर्च, असा दोन कोटी १० लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सभापती चौधरी यांनी स्थायी समितीचे सभापती विकास म्हात्रे यांना सादर केला. यावेळी चौधरी यांनी मनोगतात परिवहन उपक्रमाच्या वास्तवतेवर प्रकाश टाकला.ते म्हणाले, ‘आजमितीला २१ वर्षे होऊनही हा उपक्रम स्थावर होण्यासाठी संघर्ष करत आहे. उपक्रम कधीही फायद्याकडे झुकला नाही. पालकसंस्था म्हणून केडीएमसीच्या आर्थिक मदतीने हा गाडा ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर चालविताना एकप्रकारे कसोटी लागत आहे. सध्या ६० ते ७० बस धावत आहेत. उपक्रमातील ५६९ कर्मचारी व कंत्राटी वाहक, चालक कर्मचारी यांच्या वतीने दररोज ४५ ते ५० हजार प्रवाशांसाठी ३३ मार्गांवरून सेवा दिली जात आहे. या वर्षात १३८ बस मार्गावर चालविण्याचे नियोजन आहे. परंतु, उत्पन्न आणि खर्च, यातील वाढती तफावत पाहता बस क्षमतेने चालविणे उपक्रमाला अडचणीचे ठरत आहे. या बाबींचा विचार करून राज्य सरकारने जीसीसी तत्त्वावर बस चालविण्याचे आदेश केडीएमसीला दिले आहेत. त्याचा पदाधिकारी आणि आयुक्तांनी सकारात्मक विचार करावा.’‘महसुली आणि भांडवली खर्चासाठी एकूण ४६ कोटी ३९ लाख रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली असून, महापालिका या अनुदानात कोणत्याही प्रकारे कपात करणार नाही, या विश्वासाने उपक्रमाने आर्थिक ताळेबंद मांडला आहे. तरतुदी केवळ कागदावरच राहणार नाहीत, याचाही महापालिकेने जरूर विचार करावा,’ असेही चौधरी म्हणाले.दरम्यान, परिवहन उपक्रमाला भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन स्थायी सभापती म्हात्रे यांनी दिले. अर्थसंकल्प सादरीकरणाच्या वेळी उपक्रमाचे व्यवस्थापक मारुती खोडके, महापालिका सचिव संजय जाधव आदी उपस्थित होते.निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यातपरिवहन टर्मिनल विकास, खंबाळपाडा आगारात परिवहन भवनाची उभारणी, कार्यशाळेचे आधुनिकीकरण, अ‍ॅटोमॅटिक वॉशिंग मशीन, स्मार्ट सिटीअंतर्गत प्रवासी निवाऱ्यांवर पीआयएस सिस्टीम, प्रवाशांच्या मागणीनुसार स्टेनलेस स्टीलचे निवारे उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका