लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : यंदाच्या पालिका निवडणुकीत भाजपा व शिवसेनेत थेट लढत होणार असली तरी सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय या दोन्ही पक्षांकडे पर्यायच राहणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस किंगमेकर ठरणार असा दावा काँग्रेसने केला आहे.शिवसेना, भाजपा स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. त्यातही दोन्ही पक्षातील काहींना युती हवी आहे तर काही त्या विरोधात कट्टर भूमिका घेत आहेत. दोन्ही पक्षात थेट लढत होणार असल्याचे गृहीत धरून इतर पक्षातील इच्छुकांनी या पक्षात उड्या घेतल्या. परिणामी इच्छुकांची गर्दी वाढल्याने उमेदवारी कुणाला द्यायची, असा प्रश्नच नेत्यांसमोर उभा ठाकला आहे. उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने काहींनी अपक्ष म्हणून प्रचाराला सुरूवात केली आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेले पुन्हा काँग्रेसचा आश्रय मागणार, असा दावा काँग्रेसने केला आहे. परंतु, त्यांना पुन्हा पक्षात न घेण्याचा पवित्रा सध्या काँग्रेसने घेतला आहे. काही इच्छुक काँग्रेसमध्ये प्रवेश घेत असून राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीचा एक गट तर काँग्रेसमध्येच प्रवेश घेण्याच्या तयारीत असल्याने पक्षाला अधिक बळकटी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असून एकूण ६५० इच्छुकांनी अर्ज दिले आहेत. त्यातील २३९ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यास प्राबल्यानुसार त्या-त्या पक्षाचा उमेदवार उभा केला जाणार आहे.
मीरा-भार्इंदरमध्ये आम्हीच किंगमेकरच्या भूमिकेत
By admin | Updated: June 28, 2017 03:20 IST