शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब नियोजनाची पुरुषांना भीती; गतवर्षी केवळ एकच शस्त्रक्रिया; महिलांच्या मात्र ४०३८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:00 IST

ठाणे जिल्ह्यातील परिस्थिती : पुरुषांमध्ये शस्त्रक्रियेबाबत जनजागृतीची गरज

सुरेश लोखंडे ठाणे : कुटुंब नियोजनाच्या दृष्टीने स्त्री, पुरुषांना नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे धोरण आहे. मात्र, ही शस्त्रक्रिया केवळ महिलांनीच करावी, असा अलिखित नियम समाजात रूढ झालेला आहे. यास आळा घालण्याची गरज काही सामाजिक संस्थांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०१९-२० मध्ये केवळ एका पुरुषाची नसबंदी शस्त्रक्रिया झालेली आढळून आली. तर याच कालावधीत जिल्ह्यात तब्बल चार हजार ३८ महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्याचे निदर्शनास आले आहे.

लोकसंख्या आवाक्यात आणण्यासाठी कुटुंब नियोजनाच्या दृष्टीने  नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे धोरण आहे. यास अनुसरून आरोग्य विभागाकडून या शस्त्रक्रियेसाठी स्त्री, पुरुषांमध्ये जनजागृती केली जात आहे. यास अनुसरून महिला मोठ्या संख्येने पुढे येऊन या शस्त्रक्रिया करून घेत आहेत. 

गेल्या वर्षी तब्बल चार हजार ३८ महिलांनी ही शस्त्रक्रिया करून घेतली. या तुलनेत पुरुषांमध्ये केवळ  एकानेच शहापूर तालुक्यात नसबंदी केल्याचे आढळले आहे. ‘हम दो, हमारे दो!’ असे म्हणत असताना त्यासाठी फक्त महिलांनी पुढे यावे, असा जणू समाजाने अलिखित नियम करून घेतला आहे.  या शस्त्रक्रियेसाठी पुरुषांनी केवळ स्वाक्षरी देऊन पत्नीच्या शस्त्रक्रियेस हिरवा कंदील देण्यात धन्यता मानली आहे.  ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ ठेवण्यासाठी महिलांनी शस्त्रक्रिया करण्याची जणू मक्तेदारी घेतलेली दिसून येत आहे. 

टॅग्स :thaneठाणे