शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मेंडोन्सांच्या एन्ट्रीने भाजपात धडकी

By admin | Updated: May 24, 2017 01:15 IST

गिल्बर्ट मेंडोन्सा यांचे महत्व अनन्यसाधारण असल्याने त्यांच्या कारागृहातील सुटकेनंतर आयारामांच्या भाऊगर्दीत वावरत असलेले भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी सावध पवित्रा घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मीरा-भार्इंदरच्या राजकारणात राष्ट्रवादीचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांचे महत्व अनन्यसाधारण असल्याने त्यांच्या कारागृहातील सुटकेनंतर आयारामांच्या भाऊगर्दीत वावरत असलेले भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी सावध पवित्रा घेतला आहे. पक्षातील गळती रोखण्यावर त्यांनी लगोलग लक्ष दिले आहे. इच्छुकांच्या जनसंपर्कालाही ब्रेक लावला आहे. शिवाय पक्षाच्या सूचनेनुसार आगामी पालिका निवडणुकीतील विजयासाठी प्रचार प्रशिक्षणालाही सुरूवात केली आहे. मेेंडोन्सा हे एका जमीन गैरव्यवहारप्रकरणी आठ महिन्यांपासून कारागृहात होते. मेंडोन्सा यांचे राजकीय वैरी ठरलेले आमदार मेहता यांनी सर्वप्रथम राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीचे काही नगरसेवक शिवसेनेतही स्थिरावले. मेंडोन्सा यांची जामिनावर सुटका झाल्याने विविध पक्षातील दिग्गजांनी त्यांची व्यक्तीश: भेट घेत विचारपूस केली. याला मेहता अपवाद ठरले. मेंडोन्सा यांच्या सुटकेमुळे मेहता यांनी सावध पवित्रा घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मेंडोन्सा हे राजकीय समीकरण बदलण्यास सक्षम असून मागील काळात त्यांनी युतीच्या तोंडातील घास अनेकदा हिरावून घेत आपल्या राजकीय वर्चस्वाचा प्रत्यय आणून दिला. २५ वर्षापासून सत्तेची चव चाखणारे मेंडोन्सा आठ महिन्यांच्या शिक्षेनंतर बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवसेना प्रवेशाचा निर्णय न घेता वेट अ‍ॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. त्यांच्या हालचालींकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा खिळल्या असल्या, तरी भाजपाने मात्र सावध राहणेच पसंत केले आहे. त्यातच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. ती शक्यता त्यांच्या सुटकेनंतर बळावली असली, तरी त्यांचा शिवसेनेतील प्रवेश मात्र लांबला आहे. प्रवेशासाठी योग्य मुहूर्ताची चाचपणी करण्यात येत असून पुढील महिन्यात त्याचा मुहूर्त निश्चित होण्याची शक्यता आहे. मेंडोन्सा यांच्या प्रत्येक डावपेचावर लक्ष ठेऊन असलेले मेहता यांची पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आऊटगोर्इंवरही बारीक नजर आहे. इच्छुकांची संख्या उदंड झाल्याने उमेदवारी कुणाला द्यायची, असा पेच मेहता यांच्यापुढे उभा ठाकला आहे.