शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अभिनय कट्ट्यावर उलगडणार शाळांच्या आठवणी; दरमहिन्याला एक शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 23:55 IST

माझी शाळा उपक्रमास आजपासून सुरुवात

प्रज्ञा म्हात्रे ठाणे : शाळा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. शाळा सोडल्यानंतरही प्रत्येक विद्यार्थ्याचे या शाळेशी अतूट नाते असते. शाळेने केलेले संस्कार कोणताही विद्यार्थी कधी विसरू शकत नाही. गुरुस्थानी मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील प्रत्येक शाळांचा प्रवास आता अभियन कट्ट्यावर उलगडला जाणार आहे. माझी शाळा या उपक्रमांतर्गत शाळेतील प्रत्येक हृद्य आठवणींना उजाळा मिळणार आहे. यात दरमहिन्याला ठाण्यातील एक शाळा येऊन आपला प्रवास मांडणार आहे.

अभिनय कट्ट्यावर वाचक कट्टा, संगीत कट्टा यानंतर आता आगळावेगळा कट्टा सुरू होत आहे. आपला पहिला गुरू आईवडील आणि आपली शाळा. शाळेने आपल्यावर केलेले संस्कार आपण कधीच विसरू शकत नाही. अभिनय कट्ट्याचे प्रमुख किरण नाकती यांच्या संकल्पनेतून अभिनय कट्ट्यावर महिन्यातून एका रविवारी ‘माझी शाळा’ नावाचा कट्टा होणार आहे. त्यात शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध कलाविष्कार, आजवरच्या शाळेच्या यशस्वी प्रवासाचा वृत्तान्त, शिक्षकांचे योगदान, विविध क्षेत्रांत कार्यरत असणाºया माजी विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी असे अनेक विषय अनुभवून आपण आपल्या शाळेच्या प्रवासावर दृष्टिक्षेप टाकणार आहोत.

१२ जानेवारी रोजी सायं. ५ वा. माझी शाळामध्ये डॉ. बेडेकर विद्यामंदिर, ठाणे या शाळेचा सन्मान अभिनय कट्ट्यातर्फे केला जाणार आहे.शाळेशी परत एकदा विद्यार्थ्यांनी जोडले जावे आणि आतापर्यंत शाळेने केलेला प्रवास आणि सध्या शाळेत सुरू असलेल्या अ‍ॅक्टिव्हिटी माजी विद्यार्थ्यांबरोबर सर्वच ठाणेकरांना समजाव्या, हाच यामागे हेतू आहे. सुरुवातीला १५ मिनिटे शाळेचा वृत्तान्त सादर केला जाईल. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. अशा कार्यक्रमांचे कट्ट्यावर सादरीकरण होईल, असे नाकती यांनी सांगितले.ठाण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम होत असून यात केवळ मराठी नव्हे तर इंग्रजी, हिंदी माध्यमांच्या शाळांचेही स्वागत आहे. सुरुवातीला महिन्यातून एकदाच हा कट्टा होईल. पण, प्रतिसाद वाढला तर महिन्यातून दोन कट्टे हे या उपक्रमासाठी असतील. - किरण नाकती