शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष प्राधिकरण सदस्य निवडीचा विषय मागे

By admin | Updated: April 19, 2017 00:29 IST

ठाणे महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले किंवा पक्षाने उमेदवारी न दिलेल्या माजी नगरसेवकांचे पुनर्वसन वृक्ष प्राधिकरणात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले किंवा पक्षाने उमेदवारी न दिलेल्या माजी नगरसेवकांचे पुनर्वसन वृक्ष प्राधिकरणात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून याठिकाणी आपली निवड व्हावी म्हणून अनेकांनी अर्ज भरले होते. त्यानुसार या सदस्यांची निवड येत्या २० एप्रिलच्या महासभेत होणार होती. परंतु, प्रशासनाने हा विषयच मागे घेऊन पुणे महापालिकेच्या धर्तीवर सुधारीत प्रस्ताव आणण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरु केल्या आहेत. पुण्याच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने निर्णय घेतल्यास विविध राजकीय पक्षातील सात तर अध्यक्ष म्हणून आयुक्त एक असे आठ आणि तज्ज्ञ मंडळींमधून सात जणांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेक माजी नगरसेवकांना यामुळे धक्का बसला आहे.वृक्ष प्राधिकरण समितीत शिवसेनेने पूजा वाघ, नम्रता भोसले यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसने अमति सरैय्या या माजी नगरसेवकांचे अर्ज वृक्षतज्ज्ञ म्हणून भरले असून उर्वरीत ४० ते ४२ अर्जांमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचाच भरणा जास्त आहे.वृक्ष प्राधिकरणाचा कारभार वादग्रस्त ठरू लागल्यानंतर या समितीवर १५ नगरसेवकांसह किमान पाच आणि कमाल १३ वृक्ष तज्ज्ञांची निवड करण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी झाला होता. या तज्ज्ञांची निवड करताना ती ठाण्यात वास्तव्याला असावीत अशी पहिली अट घालून शहराबाहेरील तज्ज्ञांच्या निविडचा मार्ग बंद केला आहे. त्यानुसार अनेक अर्ज आल्यानंतर सोमवारी त्याबाबतची छाननी झाली असून जवळपास ४२ जणांनी या पदांसाठी अर्ज केले आहेत. त्यात चक्क तीन माजी नगरसेवकांसह सेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचाही भरणा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे वृक्ष प्राधिकरणातील तज्ज्ञ समितीच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान प्रशासनाने आता हा विषयच मागे घेतला असून नव्याने सुधारीत प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पुणे महापालिकेत झालेल्या निर्णयाचा आधार घेऊन त्यानुसार आता नव्याने सदस्यांची निवड करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले की, पुणे महापालिकेच्या धर्तीवर उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय राज्यातील सर्वच महापालिकांना लागू होत असल्याने त्याचा आधार घेऊन हा विषय मागे घेतला आहे. आता सुधारीत प्रस्ताव तयार करुन तो सादर केला जाईल. (प्रतिनिधी)