शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मेहतांचा आज फैसला

By admin | Updated: November 7, 2016 02:47 IST

नगरसेवक असताना २००२ मध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई होऊ नये म्हणून २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेले भाजपाचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता

मीरा रोड : नगरसेवक असताना २००२ मध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई होऊ नये म्हणून २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेले भाजपाचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधातील खटल्याचा निकाल सोमवारी, ७ नोव्हेंबरला लागणार आहे. गेली १४ वर्षे हा खटला सुरू होता. ठाणे न्यायालयातील विशेष न्यायाधीश (एसीबी) व्ही . व्ही . बांबर्डे हे निकाल देतील. त्यावर वादग्रस्त ठरलेल्या मेहतांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. मीरा-भार्इंदरची पहिली निवडणूक २००२ च्या आॅगस्टमध्ये झाली. तेव्हा पहिल्यांदाच मेहता अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. प्रभागातील जुन्या औद्योगिक गाळ््याच्या बांधकामाचे कंत्राट घेतलेले ठेकेदार हनुमंत मालुसरे यांच्या अनधिकृत बांधकामाची तक्रार व कारवाई होऊ नये, म्हणून नरेंद्र मेहतांनी पन्नास हजारांची लाच मागितली. त्यातील वीस हजारांचा पहिला हप्ता घेताना २७ डिसेंबरला फाटक मार्गावरील त्यांच्या कार्यालयातच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. त्याचा खटला ठाणे न्यायालयात आठ वर्षे चालला. तेव्हा मेहतांनी मी लोकसेवक नसल्याचा दावा केला. न्यायाधीश सईद यांनी तो मान्य करत २०१० मध्ये खटला संपुष्टात आणला. त्याविरूद्ध शासनाने २०१२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात अपिल केले. मालुसरे यांनीही उच्च न्यायालयात दाद मागितली. गेल्या वर्षी ३ मार्चला उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती एम. एल. ताहिलयानी यांनी नगरसेवक हा लोकसेवक असल्याचा निर्णय दिला आणि मेहता यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी चार आठवड्याची मुदत दिली होती. त्यानुसार मेहतांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगतसिंग खेकर व न्यायाधीश शरद बोबडे यांनी नगरसेवक हा लोकसेवक असल्याचा मुद्दा मान्य करत मेहतांना दणका दिला आणि त्यांची याचिका संपुष्टात आणली. त्यानंतर ठाणे न्यायालयात पुन्हा मेहतांविरु द्ध लाच घेताना पकडल्याचा खटला गेल्यावर्षी पुन्हा सुरू झाला. राजू गोयल या कार्यकर्त्याने मेहतांकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यावेळी लोकायुक्त असलेले माजी न्यायाधीश एम. एल. ताहिलयानी यांना हे प्रकरण माहित असल्याने त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीचे आदेश दिले. त्यावर दोन्ही बाजुंचे युक्तिवाद संपले आणि विशेष न्यायाधीश (एसीबी) व्ही. व्ही. बांबर्डे यांनी या खटल्याचा निकाल ७ नोव्हेंबरला लागेल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)