डोंबिवली : मध्य रेल्वेवर कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर, तर हार्बरवर कुर्ला-वाशीदरम्यान अप-डाउन मार्गावर रविवारी सकाळी ११.३० ते दुपारी ४.१० दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे कल्याण-ठाणे अप जलद मार्गावरील वाहतूक कालावधीत अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. हार्बरवरील ब्लॉकमुळे सीएसटी ते पनवेल दिशेकडील अप-डाउन सेवा रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल-वाशी मार्गावर तसेच सीएसटी-कुर्ला मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांना सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ट्रान्स हार्बर व मुख्य मार्गावरून प्रवासाची मुभा असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)
मध्य, हार्बरवर मेगाब्लॉक
By admin | Updated: April 1, 2017 05:33 IST