शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ बैठक म्हणजे बैल गेला आणि झोपा केला!, राज्यमंत्र्यांवर मनसेची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:11 IST

कल्याण-डोंबिवली शहरांतील समस्यांवर चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी केडीएमसीतील अधिकाऱ्यांबरोबर मंत्रालयात बैठक घेतली होती.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांतील समस्यांवर चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी केडीएमसीतील अधिकाऱ्यांबरोबर मंत्रालयात बैठक घेतली होती. विधानसभा निवडणुका जवळ येताच राज्यमंत्र्यांना समस्यांची जाणीव झाल्याचा आरोप मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. बैल गेला आणि झोपा केला, असेच मंत्रालयातील बैठकीबाबत बोलणे उचित ठरेल. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले असूनही शहरात विकासाची गंगा आणण्यात चव्हाण अपयशी ठरले आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर बैठकांचा दिखावा सुरू असल्याकडेही कदम यांनी लक्ष वेधले.मनसेच्या पत्रकार परिषदेला कदम यांच्यासह केडीएमसीतील मनसेचे गटनेते मंदार हळबे, डोंबिवली शहर महिलाध्यक्ष मंदा पाटील, प्रतिभा पाटील, सुदेश चुडनाईक, सागर जेधे, निलेश भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. कदम पुढे म्हणाले की, राज्यमंत्री चव्हाण यांनी साडेनऊ वर्षांत शहरात कोणतीच विकासाची कामे केली नाहीत. महापालिका, राज्यात आणि देशात सत्ता असतानाही बंद पडलेले सूतिकागृह, २७ गावांमधील अपुरा पाणीपुरवठा, प्रदूषण, खड्डेमय रस्ते, अनधिकृत बांधकामे, रिक्षाचालकांची मुजोरी, वाहतूककोंडी, ट्रेनमधली गर्दी, रखडलेले प्रकल्प अशा विषयांकडे डोळेझाक करत केवळ मी डोंबिवलीकरची टूम चव्हाण वाजवत राहिले. महापालिकेत शिवसेनेबरोबर सत्तेत असतानाही शुक्रवारी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीला महापौर, सभापती, आमदार यांना का बोलावले नाही. एकतर्फी बैठक घेण्यामागचे गौडबंगाल काय? असा सवाल कदम यांनी केला. राज्यमंत्र्यांनी १० वर्षांच्या आमदारकीच्या कालावधीत किती निधी विकासकामांसाठी दिला, याचा लेखाजोखा मांडावा, अशीही मागणी यावेळी केली. तर, वाढत असलेली अनधिकृत बांधकामे, गुन्हेगारी, प्रकल्पांमधील भ्रष्टाचार याबाबत आवाज उठवण्याऐवजी राज्यमंत्र्यांनी चुप्पी साधली असल्याचा आरोप मंदार हळबे यांनी केला. दरम्यान, मनसेच्या आरोपांसंदर्भात ‘लोकमत’ने राज्यमंत्री चव्हाण यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही....तर ५०१ रुपयांचे बक्षीस देऊराज्यमंत्र्यांनी आमदारकीच्या आतापर्यंतच्या साडेनऊ वर्षांच्या कालावधीत एकही विकासाचे काम केलेले नाही. त्यांनी एखादा प्रकल्प दाखवावा, ज्यात गैरव्यवहार अथवा चौकशी सुरू नाही आणि तो पूर्ण झाला आहे. असा एखादा तरी प्रकल्प दाखवल्यास मनसेतर्फे त्यांना ५०१ रुपयांचे बक्षीस देऊ, असे आव्हान कदम यांनी यावेळी दिले. शिवसेना पदाधिकारी आणि राज्यमंत्र्यांच्या वादामुळे सहा वर्षे बंद असलेल्या सूतिकागृहाचे काम सुरू होत नसल्याचा आरोपही कदम यांनी यावेळी केला. शास्त्रीनगर रुग्णालयात पोस्टमार्टमची व्यवस्था करणे व महापालिका रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने भरती करणे, असा घाट सध्या घातला जात आहे. एकीकडे महापालिकेची रुग्णालये सरकारकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असताना हा खाजगीकरणाचा घाट कशासाठी, असा सवालही कदम यांनी केला आहे.

टॅग्स :thaneठाणे