शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओमी टीमला शह देत दोन्ही काँग्रेसची बैठक

By admin | Updated: January 23, 2017 05:28 IST

ओमी कलानी यांची टीम राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून बाहेर निघाल्यावर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस

उल्हासनगर : ओमी कलानी यांची टीम राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून बाहेर निघाल्यावर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गुप्त बैठक घेत चर्चा केली. स्वबळाचा इशारा दिल्यानंतर अवघ्या एका दिवसांत कोलांटउडी मारत राष्ट्रवादीने या चर्चेत भाग घेतल्याने ओमी यांच्या पक्षत्यागाच्या पार्श्वभूमीवर पक्षात खलबते सुरू झाल्याचे दिसून आले. कॉग्रेसचे शहर अध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला यांनी या चर्चेला दुजोरा दिला, तर कॉग्रेसशी आघाडीला विरोध असल्याचा पुनरूच्चार राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षा ज्योती कालानी यांनी केला. त्यामुळे पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले असून शह-काटशहाचे राजकारण सुरू झाल्याचे स्पष्ट झाले.दुसरीकडे कलानी कुटुंबाचे कट्टर विरोधक भरत गंगोत्री यांना प्रोत्साहन देत, त्यांचे वर्चस्व वाढवत, पक्ष पर्यायी व्यवस्था उभारत असल्याची चर्चा या घडामोडींवरून सुरू झाली. कलानी कुटुंब आणि ओमी टीमला शह देण्यासाठीच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आघाडीचे काटकारस्थान खेळल्याची प्रतिक्रिया ओमी टीमच्या सदस्यांनी व्यक्त केली.कलानी महल येथील पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी शनिवारी आघाडी तुटल्याचे जाहीर केले. कॉग्रेसकडूनच प्रस्ताव आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होत. त्यानंतर ज्योती कलानी यांनी कॉग्रेसशी आघाडीला विरोध केला होता. त्याला एक दिवस उलटत नाही, तोच कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे, शहर अध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला, माजी महापौर हरिदास मखिजा, अमरलाल छ्राब्रीया यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव यांनी प्रवीण हॉटेल येथे गुपचूप बैठक घेतली. ओमी कलानी यांच्यामुळे आघाडी करता येत नाही. ज्योती यांचाही त्याला विरोध आहे. पण ओमी भाजपात गेल्यावर आयत्यावेळी राष्ट्रवादीची अवस्था केविलवाणी होईल. त्यामुळे आतापासूनच पक्षाने पर्याय शोधण्यास सुरूवात केली आहे, हे रविवारच्या गुप्त बैठकीतून दिसून आले. गणेश नाईक यांच्या आदेशानुसारच हिंदुराव येथे आल्याची माहिती लुल्ला यांनी दिली. त्यांच्यामार्फतच आघाडीचा प्रस्ताव पाठविला जाईल. प्रस्ताव मान्य झाला, की आघाडीची पुढील बोलणी सुरू होतील, असे ते म्हणाले. हिंदुराव यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप ज्योती यांनी केला. आम्ही आमचा विरोध आधीच स्पष्ट केलेला असतानाही ही बैठक झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत प्रमोद हिंदुराव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)