शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर महापालिकेची मोहीम ' ना कचरा फेकणार, ना फेकू देणार '

By धीरज परब | Updated: October 27, 2023 15:13 IST

नागरिकांच्या सहभागाने  शहर स्वच्छतेसाठी व्यक्त केला निर्धार 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी शहर स्वच्छतेसाठी नागरिकांना प्राधान्य देत ' ना कचरा फेकणार , ना फेकू देणार ' अशी मोहीम सुरु केली आहे . तर १६ ऑक्टोबर पासून पालिकेने रोज चालवलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेचे १० दिवस पूर्ण झाले असून आणखी ९ दिवस मोहीम चालणार आहे.  

पालिकेने नागरिकांच्या पुढाकाराने चालवलेल्या ना कचरा फेकणार, ना फेकू देणार मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळेल अशी खात्री प्रशासनाला आहे . त्यासाठी महिला , पालिका अधिकारी - कर्मचारी सह स्वयंसेवी संस्था,  शाळा - महाविद्यालये, एनएसएसचे विद्यार्थी तसेच गृह संकुले , झोपडपट्टी व  गावठाण मधील रहिवाशी , रिक्षा चालक आदींना सहभागी करून घेण्यात आले आहे .  रस्ते - पदपथ व सार्वजनिक ठिकाणी कचरा, डेब्रिस टाकण्यास मनाई , प्लास्टिक बंदी , सांडपाणी प्रक्रिया , बॅनर मुक्त शहर , ओला व सुका कचरा वर्गीकरण आदी विविध मुद्द्यांवर महापालिकेने मोहीम चालवली आहे. 

विकासकांना सुद्धा सहभागी करून घेतले जात असून लता मंगेशकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात  डीबी रियाल्टीचे  राजीव अग्रवाल यांनी,  समाज, महापालिका आणि उद्योग एकत्र येऊन काम केल्यास शहर स्वच्छ , सुंदर व प्रगतिशील बनेल असा विश्वास व्यक्त केला. मीरा भाईंदर हे देशातील पहिल्या क्रमांकाचे हरीत स्वच्छ शहर होण्यासाठी सामुहिक प्रयत्न व लोकांमध्ये स्वच्छतेचा विचार बिंबवणे हे मुख्य उदिष्ट आहे. विशेष मोहिमेत ३५० टन पेक्षा जास्त कचरा गोळा करण्यात आला.  १० दिवसात जवळपास ३०४ किलो प्लास्टिक जप्त करून ७ लाखापेक्षा जास्त दंड वसुल केला आहे . नागरिक व व्यावसायिकांनी प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी बॅग सोबत बाळगणे अनिवार्य आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास नक्की थांबेल असे आयुक्त संजय काटकर म्हणाले.