शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मीनाताई ठाकरे रंगायतनच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 00:23 IST

भिवंडी पालिकेचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : शहरातील तीन वर्षांपासून बंद असलेल्या मीनाताई ठाकरे रंगायतनच्या दुरुस्तीला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे येथील नाट्यरसिकांनी मनपा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, हे नाट्यगृह बाजारपेठेत अडगळीच्या ठिकाणी असल्याने या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च न करता कामतघर येथील वऱ्हाळ तलाव परिसरात नव्याने रंगायतन उभारावे अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक मनोज काटेकर यांनी केली आहे.

१२ मार्च रोजी होणाऱ्या ऑनलाइन महासभेच्या पटलावर हा विषय ठेवण्यात आला आहे. भिवंडीतील मध्यवर्ती ठिकाणी १९९६ मध्ये मीनाताई ठाकरे हे भलेमोठे नाट्यगृह बांधले. परंतु बाजारपेठेतील अरुंद रस्ते व दाटीवाटीमुळे येथे पोहोचण्यासाठी नाट्यकर्मींना होत असलेल्या त्रासापाई या ठिकाणी सुरुवातीपासून नाट्यकर्मी कधी फिरकलेच नाहीत. त्यामुळे हे नाट्यगृह शहरातील शाळा, महाविद्यालय यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसह सभा, संमेलन याच कामी उपयोगी आले. नाट्यगृहाच्या देखभाल व दुरुस्तीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी कायम दुर्लक्ष केल्याने या नाट्यगृहाची वाताहत झाली आहे. तीन वर्षांपूर्वी एका खिडकीचे तावदान निखळून पडल्याने अपघात झाल्याने तेव्हापासून हे नाट्यगृह सार्वजनिक वापरासाठी बंद ठेवले आहे. या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च अपेक्षित असताना व महापालिका प्रशासनाची खर्च करण्यासाठी मानसिकता नसल्याने मनपा प्रशासन सरकारी निधीकडे डोळे लावून बसले आहेत.

दरम्यान, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत या नाट्यगृह दुरुस्तीसाठी दहा कोटी रुपये खर्चास मान्यता दिली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने खर्चाचा आराखडा १३ कोटींचा तयार केला, मात्र या आराखड्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे हे नाट्यगृह धूळखात आहे. याबद्दल रसिकांनी खेद व्यक्त केला आहे.

नवे नाट्यगृह रसिक, नाट्यकर्मींसाठी सोयीस्करकाटेकर यांनी या नादुरुस्त व २५ वर्षं जुन्या नाट्यगृहावर खर्च करणे हे अयोग्य असून त्यापेक्षा २० कोटी खर्च करून नवे नाट्यगृह वऱ्हाळ तलाव परिसरात उभारावे त्यासाठी सुयोग्य जागा या परिसरात उपलब्ध असून हे ठिकाण नाट्यकर्मी व नाट्यरसिक या दोघांसाठी सोयीस्कर आहे. याबाबत प्रशासनाने पाठपुरावा केल्यास राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होऊ शकतो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी