शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

कोणाचीही तमा न बाळगता अनाधिकृत होर्डींग्जवर कारवाई करण्याचे महापौर मीनाक्षी शिंदे यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 12:35 IST

ठाणे शहरातील अनाधिकृत होर्डींग्जचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शहरात अनाधिकृत होर्डींग्जच नसल्याचा दावा महापालिकेने केला आहे. परंतु या अनाधिकृत होर्डींग्जचा शोध घेऊन त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देशहरात ५९६ अधिकृत होर्डींग्जदोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

ठाणे - ठाणे महापालिका हद्दीत अधिकृत होर्डींग्जचा आकडा पालिकेच्या दप्तरी असला तरीसुध्दा अनाधिकृत होर्डींग्ज कीती याची माहिती मात्र प्रशासनाला पुन्हा एकदा देता आलेली नसल्याची बाब गुरुवारी झालेल्या महासभेत उघड झाली आहे. परंतु या अनाधिकृत होर्डींग्जमुळे महापालिका प्रशासनाचा महसुल बुडत असून येत्या दोन दिवसात शहरात कुठे आणि कशा पध्दतीने अनाधिकृत होर्डींग्ज लागले आहेत, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच या होर्डींग्जवर तत्काळ कारवाई करा, असे सांगतांनाच कोणत्याही नेत्याचे होर्डींग्ज असेल तरी कोणाचाही तमा न बाळगता त्यांच्यावरही कारवाई करा अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.                     गुरुवारच्या महासभेत प्रश्नाउत्तरांच्या तासांच्यावेळी भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी शहरातील अधिकृत आणि अनाधिकृत होर्र्डींग्ज बाबत प्रशासनाला सवाल उपस्थित केला. शहरात अधिकृत होर्डींग्ज ५९६ असले तरी अनाधिकृत होर्डींग्ज कीती याची माहिती मात्र प्रशासनाला देता आली नाही. त्यामुळे शहरात कुठेच अनाधिकृत होर्डींग्ज नाहीत का? असा सवाल सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. त्यातही जे अधिकृत होर्डींग्ज लावण्यात आले आहेत, त्या ठिकाणीसुध्दा परवानगी २० बाय २० ची असेल तर ३० बाय ४० फुटांचे होर्डींग्ज लावले जात आहे. शहरातील नौपाडा, हरिनिवास, घोडबंदर अशा अनेक ठिकाणी असे होर्डींग्ज लागले असल्याचा मुद्दा सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. तर या सर्वांवर सरसकट कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली. भविष्यात ठाण्यात पूण्यासारखी घटना घडल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत का? असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला. त्यातही कळवा खाडीतील होर्डींग्जवर अद्याप कारवाई का झाली नाही, असा सवाल पेंडसे यांनी उपस्थित केला. परंतु या संदर्भात न्यायलयीन प्रक्रिया सुरु असल्याने त्यावर कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.दरम्यान अनाधिकृत होर्डींग्ज बाबत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सुध्दा नाराजी व्यक्त केली. कापुरबावडी जंक्शनवर मोडकळीस आलेल्या इमारतीच्या आड भले मोठे होर्डींग्ज लागले आहे. शहरातील इतर भागातही अशीच परिस्थिती असल्याने या अनाधिकृत होर्डींग्ज अहवाल येत्या दोन दिवसात सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच होर्डींग्ज कोणाचेही असेल तरी कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता त्या सर्व होर्डींग्जवर कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त