शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

लोकमान्य नगरच्या त्या रुग्णाच्या संपर्कातील वैद्यकीय कर्मचाऱ्यालाही झाली लागण, कळवा हॉस्पीटल मधील लेबर ओपीडी पालिकेने केली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 17:51 IST

लोकमान्य नगर भागातील मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची आता तपासणी सुरु असतांनाच कळवा रुग्णालयातील एका महिला वैद्यकीय कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या संपर्कातील ६० वैद्यकीय कर्मचारी आता हायरीस्कमध्ये आले असून येथील लेबर ओपीडीही बंद करण्यात आली आहे.

ठाणे : लोकमान्य नगर भागातील मृत झालेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या ६० हून अधिक नागरीकांना पालिकेने क्वॉरन्टाईन केले आहे. परंतु त्याच्या संपर्कात आलेल्या कळवा रुग्णालयामधील महिला वैद्यकीय कर्मचारी हिला देखील आता कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे या रुग्णालयातील ६० वैद्यकीय कर्मचारी देखील हायरीस्कमध्ये आले असून त्यांनाही क्वॉरान्टाइन केले गेले आहे. तसेच येथील लेबर ओपडी देखील बंद करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.           काही दिवसांपूर्वी लोकमान्य नगर भागातील एका रुग्णाला उपचारासाठी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु दुसºया दिवशीच त्याचा मृत्यु झाला. मृत्यु नंतर रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृतदेह घरच्यांच्या स्वाधीन केला. परंतु मृत्यु नंतर दोन दिवसांची त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझीटीव्ह आला. त्यामुळे लागलीच लोकमान्य आणि सावरकर नगर, शास्त्रीनगर रविवार पर्यंत बंद करण्यात आले. तर त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन ६० हून अधिक नागरीकांना पालिकेच्या माध्यमातून क्वॉरान्टाइन करण्यात आले. आता त्याच्या संपर्कात आलेल्या कळवा रुग्णालयातील एका वैद्यकीय सेवा देणाºया महिला कर्मचाºयालाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक मााहिती समोर आली आहे. सध्या या कर्मचारी महिलेला येथील खाजगी रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु आता कळवा रुग्णालयातील तब्बल ६० वैद्यकीय कर्मचारी हायरीस्कमध्ये आले असून त्यांनाही आता क्वॉरान्टाइन करण्याची तयारी पालिकेने केली आहे. तसेच येथील लेबर ओपीडी देखील पालिकेने बंद केली असल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या