शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आता यांत्रिक भातशेती

By admin | Updated: July 16, 2016 01:45 IST

जिल्ह्यातील भातपीक हे शेतीतील प्रमुुख उत्पादन आहे. उत्पन्नाच्या ९० टक्के खर्च यासाठी काम करणाऱ्या मजुरांवर असे. पण, हा खर्च सध्या परवडणारा नाही

ठाणे : जिल्ह्यातील भातपीक हे शेतीतील प्रमुुख उत्पादन आहे. उत्पन्नाच्या ९० टक्के खर्च यासाठी काम करणाऱ्या मजुरांवर असे. पण, हा खर्च सध्या परवडणारा नाही. यामुळे जिल्ह्यात भातरोवणी, मळणी आणि कापणीसाठी आता खास यांत्रिक पद्धतीचा वापर केला जात असून जिल्हा परिषदेकडून महिला बचत गटांना यासाठी यंत्रे उपलब्ध करून दिली जात आहेत. अशाच एका यंत्रावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष भातरोवणी करून या फायदेशीर भातशेती व बारमाही शेतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सूतोवाच केले. कृषी विभागाद्वारे जिल्हा कृषी अधिकारी महावीर जंगटे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुक्यातील तळवली येथे सिमेंटचा बंधारा बांधला आहे. त्यातील पाण्याचे शिंदे यांनी जलपूजन करून वडवली येथे भातरोवणी यंत्रावर बसून चिखलणीत प्रत्यक्ष भातरोवणी केली. जमीन तयार करणे, चिखलणी, लावणी, काढणी, मळणी या प्रत्येक कामासाठी मजूर लागतात. मात्र, या यंत्रामुळे लावणीच्या खर्चात ५० टक्के, तर मजुरीच्या ७५ टक्के खर्चात बचत होते. एका दिवसात तीन एकरमध्ये या यंत्राद्वारे लावणी केली असून अर्धा लीटर डिझेलमध्ये एक तास भातरोवणी केली जात असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी या वेळी सांगितले.भातलावणीपासून ते काढणीपर्यंत एकंदर ८७ मजूर प्रतिदिन लागतात. ३५० रुपये प्रतिदिन मजुरीप्रमाणे एका दिवसासाठी या मजुरांचा खर्च हेक्टरी ३० हजार ४५० रु पये येतो. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ६० हजार ७१७ हेक्टर जमिनीवर भाताची लागवड केली जाते. उत्पादन खर्चाच्या ९० टक्के खर्च हा मजुरीवर जातो. तो कायमस्वरूपी टाळण्यासाठी या यंत्राचा वापर करून महिला बचत गटांच्या ग्रामसंघांना रोजगार मिळवून दिल्याचे जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी प्रफुल्ल बनसोडे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेने आपल्या सेस निधीतून औजारे बँक ही नावीन्यपूर्ण योजना जिल्ह्यात आणली आहे. ग्रामीण भागातील नोंदणीकृत महिला बचत गटांचे ग्रामसंघ निवडून त्यांना जास्तीतजास्त सात लाख रु पयांपर्यंत अनुदान देऊन औजारे उपलब्ध करून दिली जातात. यंदाही दोन कोटी खर्चून या यंत्रांची खरेदी केली जाणार आहे.