शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

एमडी अंमली पदार्थाची उत्तर प्रदेशातील फॅक्टरी ठाणे पोलिसांनी केली उद्धवस्त

By जितेंद्र कालेकर | Updated: March 18, 2024 19:45 IST

गुन्हे शाखेची कारवाई: अडीच कोटींच्या एमडीसह २७ कोटी ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

ठाणे : उत्तर प्रदेशातील एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने पदार्फाश केला आहे. या प्रकरणी युपीतील वाराणसी जिल्ह्यातून अतुल सिंह (३६) आणि संतोष गुप्ता (३८) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून अडीच कोटींची २५ किलाे ग्रॅम एमडी पावडर, ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे रसायन आणि इतर साहित्य असे २७ कोटी ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी सोमवारी दिली.

ठाण्यातील कासारवडवली भागात युनिट एकच्या पथकाने २४ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आफताफ अजीज मलाडा (२२, नालासोपारा,जिल्हा पालघर), जयनाथ यादव उर्फ कांचा (२७, नालासोपारा), शेरबहाद्दूर उर्फ अंकित (२३, नालासोपारा) आणि हुसेन सैय्यद (४८, नालासोपारा) या चौघांना अटक केली हाेती. त्यांच्या ताब्यातून १४ लाखांचे ४८१ ग्रॅम एमडी जप्त केले होते. सखाेल तपासात या टोळक्याने यूपीतून ड्रग्ज आणल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील आणि सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पोळ, उपनिरीक्षक आनंदा भिलारे, हवालदार विजय यादव आदींचे एक पथक उत्तरप्रदेशात गेले. भगवतीपूर या छोट्याशा गावात तब्बल दीड महिना वेषांतर करून ड्रग्ज फॅक्टरीचा या पथकाने शोध घेतला. फॅक्टरीची माहिती मिळताच १६ मार्च २०२४ रोजी यूपीच्या स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने या ड्रग्ज फॅक्टरीवर या पथकाने छापा टाकला. यावेळी अतुल सिंह आणि संतोष गुप्ता या दोघांना एमडी ड्रग्जची निर्मिती करतांना रंगेहाथ पकडले. शेतातील एका घरातच थाटलेल्या ड्रग्ज फॅक्टरीतून एमडी बनविण्यासाठी लागणारे रसायन, इतर साहित्य, एक कार आणि दोन कोटी ६४ लाखांचे तयार एमडी असा २७ कोटी ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात ठाणे पोलिसांना यश आले. आतापर्यंत या प्रकरणात सहा आरोपींना अटक केली. साेनू गुप्ता याच्याकडून माहिती मिळाल्यानंतर यातील आणखी दाेघांना अटक केली. न्यायालयामार्फत ट्रान्सिट कोठडी मिळाल्यानंतर त्यांना थेट विमानाने ठाण्यात आणण्यात आले. परराज्यात ठाणे पोलिसांनी पहिल्यांदाच ड्रग्ज निर्मितीच्या फॅक्टरीचा पर्दाफाश करुन आरोपींना सिनेस्टाईल पकडल्याने तपास पथकाचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी कौतुक केले आहे.

टॅग्स :thaneठाणे