शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘एमडी’चा यूपीतील कारखाना उद्ध्वस्त; ठाणे पोलिसांची कारवाई, २० कोटींचा मुद्देमाल हस्तगत!

By जितेंद्र कालेकर | Updated: April 30, 2024 20:30 IST

सात आरोपींना अटक.

ठाणे : उत्तर प्रदेशातील मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाच्या पावडर निर्मितीचा आणखी एक कारखाना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने उद्ध्वस्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी दिली. यामध्ये वाराणसीमधील सूत्रधार संदीप तिवारी यासह सहाजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एमडी पावडरसह २० कोटी १८ लाख ४९ हजार ७१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यापूर्वी याच प्रकरणात ठाण्यातील कासारवडवली पोलिस ठाण्यात २४ जानेवारी २०२४ रोजी एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये आफताब मलाडा याच्यासह सातजणांना अटक केली होती. सुरुवातीला केवळ १५ ग्रॅम एमडी पावडरसह दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. सखोल चौकशीत उत्तर प्रदेशातून २७ कोटी ७८ लाख ५५ हजारांचा मुद्देमालासह एमडी पावडर निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. यामध्ये क्रिस्टल पावडर बनविण्याच्या सामुग्रीचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रूपाली पोळ यांच्यासह चार पथकांनी पुन्हा उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये वेषांतर करून दोन आठवडे तळ ठोकला. यूपीच्या विशेष कृती दलाचे अतिरिक्त अधीक्षक विनोद सिंग यांच्या मदतीने आरोपी विजय पाल आणि बिंदू यांचा शोध घेतला. या टोळक्याने आजमगढ येथे अमली पदार्थ बनविण्याचा कारखाना सुरू केल्याची माहिती मिळाली. त्याच आधारे ठाणे पोलिसांनी यूपीच्या एसटीएफच्या मदतीने जौनपूर व आजमगढ दि. २४ एप्रिल रोजी छापा टाकला.

यामध्ये संदीप तिवारी, ललित उर्फ सोनू राकेश चंद्र पाठक, अनिल जयस्वाल, (रा. नालासोपारा, जि. पालघर), नीलेश पांडे (रा. गुजरात, मूळ रा. उत्तर प्रदेश), विजय रामप्रसाद पाल आणि बिंदू उर्फ जिलाजीत जोखई पटेल, (रा. वाराणसी) यांना अटक केली. त्यांच्या आजमगड येथील कारखान्यातून २५ ग्रॅम एमडी क्रिस्टल पावडर, केमिकल मिक्स करून २० किलोपर्यंत एमडी हा अमली पदार्थ तयार होत असलेले मिश्रण, आरोपींची कार आणि इतर सामुग्री असा २० कोटी १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कच्चे मटेरियल, केमिकल, मोबाइल फोन, वाहने असा ऐवज जप्त केला आहे. सखोल चौकशीत दिलीप जयस्वाल यालाही अटक करण्यात आली आहे. आराेपींना पोलिस कोठडीयातील संदीप तिवारी उर्फ डॉक्टर हा या टोळीला तसेच यापूर्वी अटक केलेल्या आरोपींना आणि मुंबईतील ड्रग्ज रॅकेटमध्येही एमडी पावडर बनविण्यासाठी केमिकलच्या मिश्रणाचा फॉम्युला तयार करून देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यामध्ये आतापर्यंत १४ आराेपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४८ काेटी १४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले. नव्याने अटक केलेल्या संदीप तिवारी याच्यासह सहाजणांना ६ मेपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणे