शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

महासभा वेळेत सुरू करण्याचा संकल्प, महापौरांचे सूतोवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 05:20 IST

ठाणे महापालिकेच्या इतिहासात महासभा कधीच वेळेत सुरूझालेली नाही.

ठाणे : ठाणे महापालिकेची महासभा यापुढे माझ्या कारकिर्दीत वेळेतच सुरूहोईल, असा दावा नवनिर्वाचित महापौर नरेश म्हस्के यांनी केला. या पूर्वीच्या तत्कालीन महापौरांनीदेखील अशाच पद्धतीने नव्या नवरीचे नऊ दिवस करून महासभा वेळेत सुरूकरण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ते कालातंराने बासनात गुंडाळले गेले. आता म्हस्के आपल्या दाव्यावर कितपत ठाम राहतात, महासभा वेळेत सुरूकरणार का, अशा अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे महासभेला असलेल्या शिपायांसाठी विशेष बॅजही तयार करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला केल्या आहेत.ठाणे महापालिकेच्या इतिहासात महासभा कधीच वेळेत सुरूझालेली नाही. हा कित्ता तत्कालीन महापौर मीनाक्षी शिंदे यांनीसुद्धा गिरवल्याचे दिसून आले. २०१७ मध्ये महापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माझ्या कार्यकाळात महासभा कोणत्याही परिस्थितीत उशिराने सुरूहोऊ देणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले होते. तसेच, महासभेला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवरदेखील कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले होते. सुरुवातीला दोन ते तीन महासभांना त्यांनी आपली आश्वासने पाळल्याचे दिसून आले. परंतु, त्यानंतर कधीच वेळेत कोणतीही महासभा सुरू झालेली नाही.मागील काही महिने तर ११.३० ची महासभा दुपारी २ ते ३ वाजतादेखील सुरू झाल्याचे दिसून आले. त्यामुळेच एक महासभा दोन ते तीन दिवस चालत होती.आजच्या सभेकडे लक्षआता पुन्हा नवनिर्वाचित महापौर म्हस्के यांनी आपला कार्यकाळ गाजविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार मेट्रोबाबत त्यांनी घेतलेली भूमिका, घाणेकरच्या वारंवार बंद पडत असलेल्या लिफ्टबाबत दाखविलेली सजगता यामुळे सध्या ते चर्चेत आहेत. आता तर महासभा वेळेतच सुरू करण्यात येईल, असे फर्मान त्यांनी काढले आहे. आता मंगळवारी म्हणजेच महासभा असून तिची वेळ ही दुपारी १२ वाजताची आहे, त्यानुसार, त्यांनी प्रत्येक अधिकाºयाला फोन करायला सांगितले असून नगरसेवकांनीदेखील वेळेत हजर राहण्याच्या सूचना फोनद्वारे दिल्या आहेत.या निर्णयाच्या शुभेच्छा महासभा वेळेत सुरूझाल्यावरच त्यांना देऊ, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली आहे. महासभेत विविध विभागांचे शिपाई हजर असतात. त्यांनादेखील आता लगाम घालण्यासाठी महासभेचे कामकाज पाहणाºया शिपायांना बॅज असावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यासही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका