शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन सेवा सक्षम करण्याचे महापौरांचे आदेश

By admin | Updated: December 17, 2015 01:54 IST

ठाणे परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांची देणी बाकी असून त्यांनी प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सध्या परिवहनच्या बसची संख्या कमी झाल्याने प्रवाशांचेही हाल होत आहेत.

ठाणे : ठाणे परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांची देणी बाकी असून त्यांनी प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सध्या परिवहनच्या बसची संख्या कमी झाल्याने प्रवाशांचेही हाल होत आहेत. या आशयाचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, त्याची दखल घेऊन महापौरांनी बुधवारी परिवहनच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन ही व्यवस्था सक्षम करण्याचे आदेश दिले आहेत. परिवहनच्या ताफ्यात ३१३ बस असतानादेखील प्रत्यक्षात १९० च्या आसपासच बस रस्त्यावर धावत आहेत. थकीत वेतनासह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी येत्या २६ जानेवारीला उपोषणाची हाक दिली आहे. या बैठकीत महापौर संजय मोरे यांनी परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी बेस्ट परिवहन सेवेकडून किंवा राज्य परिवहन मंडळाकडून प्रतिनियुक्तीवर व्यवस्थापकासह वाहतूक सल्लागार नियुक्त करणे, यासाठी बैठक आयोजित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. सर्वच शहरांतील परिवहन सेवांमध्ये ईटीआयएम मशीन वापरल्या जात आहेत. मात्र, ठाणे परिवहन सेवेत आजही मानवी पद्धतीने तिकीट सेवा सुरू आहे. त्यामुळे एसआरटीयूच्या दरकरारानुसार मायक्र ोफॅक्स या कंपनीच्या ईटीआयएम मशिन्सच्या माध्यमातून तिकीट सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी जानेवारी महिन्यात होणाऱ्या महासभेत आणण्याचे आदेशही त्यांनी दिले. बसगाड्यांचे वेळापत्रक, चालक, वाहक हे कोणत्या मार्गावरच्या बसमध्ये काम करीत आहेत, याची माहिती मिळण्यासाठी अद्ययावत संगणकप्रणाली विकसित करण्यासंबंधीही बैठकीत चर्चा करण्यात आली. बेस्टमध्ये विलीन करा : ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात बसची संख्या अपुरी असल्यामुळे अतिरिक्त फेऱ्या वाढविणे शक्य नसल्याचे पत्र महापालिकेचे विरोधी पक्षनेते संजय भोईर यांना परिवहन प्रशासनाने पाठविले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी परिवहन प्रशासनाला पुन्हा एक पत्र पाठविले असून त्यामध्ये परिवहन सेवेचे बेस्टमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी केली आहे. ठाणे शहरातील विविध मार्गांवर प्रवाशांच्या मागणीनुसार अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यासाठी परिवहन सक्षम नसेल तर परिवहन सेवेचे बेस्टमध्ये विलीनीकरण करा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.