शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांची दुटप्पी भूमिका , शिवसेनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:29 IST

शहरातील बेकायदा बांधकामांबाबत महापौर मीना आयलानी यांनी दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई करा तर दुसरीकडे कॅम्प नं-५ कब्रस्तानाच्या भूखंडावरील बांधकामांना महापौर पाठिशी घालत

उल्हासनगर : शहरातील बेकायदा बांधकामांबाबत महापौर मीना आयलानी यांनी दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई करा तर दुसरीकडे कॅम्प नं-५ कब्रस्तानाच्या भूखंडावरील बांधकामांना महापौर पाठिशी घालत असल्याची टीका सेनेने केली. आयुक्तांनी मात्र बेकायदा बांधकामांबाबत तलवार म्यान केल्याने त्यांच्यावर खापर फोडले जात आहे.उल्हासनगरमध्ये बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाला असून याप्रकरणी महापौर आयलानी यांना जबाबदार धरण्यात आले. अखेर महापौरांनी २९ सप्टेंबरला आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना निवेदन देत बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली. अशा बांधकामांमुळे पालिकेसह शहराची प्रतिमा मलीन होत असल्याचे निवेदनात महापौरांनी म्हटले. तर दुसरीकडे कॅम्प नं-५ कैलास कॉलनी येथील कब्रस्तानाच्या आरक्षित भूखंडावरील दुकानदारांना पाठिशी घालत आहे, अशी दुटप्पी भूमिका महापौर घेत असल्याचा आरोप शिवसेनेसह इतर पक्षांनी व सामाजिक संघटनांनी केला आहे.कब्रस्तानाच्या आरक्षित भूखंडावरील दुकानदारांकडे मालमत्ता कर पावती असली तरी मालकी हक्काचे पुरावे नाहीत, अशी माहिती प्रभाग अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली. आयुक्तांच्या आदेशानुसार एक महिन्यापूर्वीच दुकानदारांना भूखंड रिकामा करण्याच्या नोटीसा दिल्याचे सांगितले.मात्र पुढील आयुक्तांचे आदेश न आल्याने दुकानांवरील कारवाई लांबल्याची कबूली शिंपी यांनी दिली. नोटीसमुळे घाबरलेल्या दुकानदारांनी महापौरांकडे धाव घेतली. महापौरांनी कोणताही विचार न करता २६ सप्टेंबरला आयुक्तांना पत्र पाठवून कारवाईपूर्वी कागदपत्र तपासण्याचे सांगून बेकायदा दुकानदारांना अप्रत्यक्ष पाठिशी घातले आहे.महापालिका क्षेत्रात आयुक्तांच्या दुर्लक्षतेमुळे नव्याने बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. गेल्या महिन्यात पोलीस संरक्षात पाडण्यात आलेली बांधकामे कुणाच्या आशीर्वादाने उभी राहिली? असा प्रश्न शिवसेनेने केला आहे. आयुक्त निंबाळकर यांच्यासह उपायुक्त संतोष देहरकर, प्रभाग अधिकारी यांना महासभेत याबाबतचे उत्तर द्यावे लागणार आहे. तसा प्रश्न महासभेत करणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.आयुक्तांनी राजकीय दडपण झुगारून बेकायदा बांधकामांवर कारवाई करून शहर विकास कामाला गती देण्याचे काम करावे, असे मतही चौधरी यांनी व्यक्त केले. यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे.