शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापौर, सत्ताधा-यांचा अट्टहास , आजपासून विद्यार्थी नव्या इमारतीत गिरवणार धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:40 IST

पालिका शाळा क्रमांक १३ व १४ चे अधिकृत उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होण्याचा अट्टहास महापौर मीना आयलानी यांच्यासह सत्ताधारी पक्षांनी धरला आहे

सदानंद नाईकउल्हासनगर : पालिका शाळा क्रमांक १३ व १४ चे अधिकृत उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होण्याचा अट्टहास महापौर मीना आयलानी यांच्यासह सत्ताधारी पक्षांनी धरला आहे. गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या वतीने शाळेचे उद्घाटन झाले असून उद्यापासून मुले शिक्षणाचे धडे नवीन इमारतीत गिरवणार असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.या शाळांची पुनर्बांधणी साडेचार कोटींच्या निधीतून करण्यात आली. इमारतीचे काम पूर्ण झाल्यावरही मुलांना लहानशा खोलीत बसवण्यात येत होते.विद्यार्थ्यांना नवीन इमारतीतील प्रशस्त खोल्यांमध्ये धडे गिरवता यावे, म्हणून बोडारे यांनी पुढाकार घेतला. गेल्या आठवड्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन केल्यावर शिवसेना व भाजपातील वाद चव्हाट्यावर आला. शाळा उद्घाटनापूर्वी महापौर आयलानी यांनी बोडारे यांची समजूत काढत शिक्षणमंत्री यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे आदींच्या हस्ते उद्घाटन करू या, असेसांगितले.महापौरांच्या विनंतीला सेनेने केराची टोपली दाखवत मुलांच्या भविष्यासाठी खासदार शिंदे, आमदार बालाजी किणीकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन उरकून घेतले. श्रेयाच्या वादात शिवसेनेने बाजी मारल्याने सत्ताधारी पक्षात नाराजी पसरली.महापौरांनी उद्या उपमहापौर जीवन इदनानी, स्थायी समिती सभापती कंचन लुंड, सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी आदींची बैठक बोलावली आहे.बैठकीत शाळेच्या उद्घाटनाची तारीख ठरवण्यात येणार असल्याचे महापौर म्हणाल्या. तर, शिवसेनेने नवीन शाळा इमारतीची साफसफाई करून उद्यापासून मुले शिक्षणाचे धडे गिरवणार असल्याचे बोडारे यांनी सांगितले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर