शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
4
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
5
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
6
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
7
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
8
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
9
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
10
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
11
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
12
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
13
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
14
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
15
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
16
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
17
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
18
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
19
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
20
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!

मैदान आरक्षणावरून महापौर-सभापतीच मैदानात

By admin | Updated: February 7, 2017 03:59 IST

भार्इंदर पश्चिमेला असलेले सुभाषचंद्र बोस मैदान भाड्याने देण्यासाठी त्याच्या आरक्षणावरुन महापौर गीता जैन आणि प्रभाग समिती सभापती

मीरा रोड : भार्इंदर पश्चिमेला असलेले सुभाषचंद्र बोस मैदान भाड्याने देण्यासाठी त्याच्या आरक्षणावरुन महापौर गीता जैन आणि प्रभाग समिती सभापती आसिफ शेख यांच्यात जुंपली आहे. हे मैदान दोन दिवसांसाठी आरक्षित केल्याची शेख यांचे नावे असलेली नोंद खोडून महापौरांचे स्वीय सहाय्यक प्रशांत पाटील यांनी महापौर आणि स्वत:चा उल्लेख केला आहे. प्रभाग समिती कार्यालयात येऊन नोंदवहीत खाडाखोड करण्याच्या प्रकाराने संतापलेले शेख यांनी ही भाजपाची गुंडगिरी असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. कचरा आणि मातीचा भराव करुन पालिकेने भार्इंदरच्या पश्चिमेला सुभाषचंद्र बोस मैदान तयार केले आहे. ते आणखी मोठे करण्याचे काम सुरू आहे. या जागेवर पूर्वी मिठागरे होती. शिलोत्र्यांचा त्यावर दावा असला, तरी कोणी पाठपुरावा करत नाही. हे मैदान व परिसर सीआरझेड एक, कांदळवन व पाणथळीने बाधित असताना महापालिका मात्र ठेकेदारांमार्फत सर्रास नव्याने माती भरावाचे काम व बांधकामे करत आहे. ही जागा शासकीय असून त्यासाठी सरकारने पालिकेकडून पैसेही मागितले आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास आणि जागेची मालकी नसताना पालिका मात्र हे मैदान भाड्याने देत आहे. त्यासाठी दिवसाला तीन हजार रुपये भाडे आकारले जाते. त्यातच मैदान भाड्याने घेण्यावरुन वादंग सुरू आहे. २५ व २६ मार्चला हे मैदान क्रिकेट सामन्यांसाठी भाड्याने मिळावे म्हणुन गणेश जाधव यांनी २ फेब्रुवारीला प्रभाग समितीचे सभापती आसिफ शेख व प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांच्याकडे अर्ज केला केला होता. त्यानुसार शेख यांनी हे मैदान त्या दिवशी राखीव ठेवण्याचा शेरा मारुन अर्ज सावंत यांच्याकडे पाठवला. तशी नोंद वहीत करून २५ व २६ मार्चला ते आसिफ शेख यांच्या नावावर राखीव ठेवण्यात आले. याच दोन दिवसांसाठी महापौरांच्या परिचयातील संस्थेला मैदान भाड्यानेहवे होते. त्यावरुन धुसफूस सुरू होती. शनिवारी सायंकाळी महापौर गीता जैन यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत पाटील यांनी भार्इंदर प्रभाग समिती कार्यालयात जाऊन पालिकेच्या नोंदवहीतील शेख यांचे नाव खोडून टाकले. तसेच दोन्ही तारखांसमोर स्वत:चे नाव व महापौर असे लिहिले. हा प्रकार कळल्याने सभापती शेख संतप्त झाले. त्यांनी शिपाई स्मिता इंगळे यांना बोलावून नोंदवहीतील खाडाखोडीबद्दल आणि परस्पर केलेल्या बदलांबद्दल विचारणा केली. त्यावर इंगळे यांनी या तारखांना मैदान राखीव ठेवण्यासाठी महापौरांचा फोन आला होता आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकानेच जबरदस्तीने नोंदी टाकल्याचे शेख म्हणाले. (प्रतिनिधी)