शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मनोरमानगर रस्ता रुंदीकरणाला महापौरांचा ब्रेक

By admin | Updated: April 18, 2017 03:20 IST

ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा मिसिंग लिंक विकसित करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, ढोकाळी, मनोरमानगर भागातील रस्त्याचे रुंदीकरण

ठाणे : ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा मिसिंग लिंक विकसित करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, ढोकाळी, मनोरमानगर भागातील रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. यात रेंटलच्या घरांमध्ये येथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा पालिकेचा विचार आहे. परंतु, रहिवाशांचे बीएसयूपी म्हणजेच हक्काच्या घरात पुनर्वसन करा. नंतरच, रस्ता रुंदीकरण करा, अशी भूमिका महापौरांनी घेतल्याने आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या रुंदीकरणाच्या मोहिमेला ब्रेक लागला आहे. काही महिन्यांपासून पालिका आयुक्तांनी रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, निवडणुकीच्या काळात या कामाला ब्रेक लागल्यानंतर पुन्हा एकदा या कामाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, मखमली, समतानगर आदी भागांत ही मोहीम पार पाडल्यानंतर आयुक्तांनी आपला मोर्चा ढोकाळी भागातील मनोरमानगर येथील एव्हरेस्ट येथून आर मॉलपर्यंत येणाऱ्या रस्त्यातील अशोकनगर, निर्मल आनंदनगरकडे वळवला. परंतु, यात जवळजवळ २१० रहिवासी बाधित होत असल्याने या रस्त्याला थेट महापौरांनीच विरोध केला आहे. प्रशासनाने बाधित लोकांना नोटिसाही देण्यात आल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या काळात ही कारवाई थंडावली होती. परंतु, या लोकांना भाड्याच्या घरात नव्याने प्रवेश देण्याऐवजी बीएसयूपीसारख्या योजनेत स्थान द्यावे, अशी मागणी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे. मुळात रेंटल हाऊसिंगमधील घरांबाबत अनेक तक्रारी असल्याने शहरासाठी नागरिक आपली घरे देत असताना या रहिवाशांना दिलासा देणे गरजेचे असल्याचे सांगून याप्रकरणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय घेण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. तसेच ज्या रस्त्याला डेड एंड आहे, तो करण्याचा अट्टहास का, असा प्रश्न केला आहे. तसेच विकास करताना रहिवाशांना पर्यायी व्यवस्था देताना ती व्यवस्थाही तेवढीच सक्षम असणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. महापौरांच्या या भूमिकेमुळे अखेर प्रशासनाला एक पाऊल मागे घ्यावे लागले असून तूर्तास या रस्त्याचे रुंदीकरण थांबले आहे. आता पुढील आठवड्यात पालकमंत्री, महापौर आणि आयुक्त यांची एकत्रित चर्चा होऊन या रस्त्याचा प्रश्न निकाली काढला जाणार आहे. (प्रतिनिधी)