शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठामपा आरक्षकांच्या भरतीवर महापौर नाराज

By admin | Updated: May 31, 2017 05:46 IST

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील आरक्षकांच्या भरतीवर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आक्षेप घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील आरक्षकांच्या भरतीवर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आक्षेप घेतला आहे. महापालिका आस्थापनेवर झालेल्या आरक्षकांच्या नियुक्तीमध्ये ठाणे शहरातील केवळ दोन जणांचा समावेश आहे. यामुळे ठाण्यात सुशिक्षित मुले नाहीत का, असा संतप्त सवाल महापौरांनी केला आहे. ठामपातील विविध पदांच्या भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देणे आवश्यक असून ही प्रक्रियाच संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ठामपाच्या आस्थापनेवर विविध पदांकरिता भरतीची प्रक्रिया राबवण्यात येते. नुकतीच महापालिका आस्थापनेवर सुमारे ३२७ आरक्षकांची नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यातून १८ जण त्यात असून शहरातील केवळ दोघांची नियुक्ती करून स्थानिकांना डावलल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. आरक्षक पदाच्या निवड यादीतील उमेदवारांची जिल्हानिहाय संख्या पुढीलप्रमाणे : सोलापूर (८), जळगाव (५०), अहमदनगर (३५), औरंगाबाद (१३), परभणी (१०), अकोला (२), नाशिक (२५), जालना (१५), नांदेड (२५), लातूर (९), पुणे (९), हिंगोली (७), ठाणे (१८), बीड (२३), रायगड (२), डोंबिवली (१), सिंधुदुर्ग (२), धुळे (७), सांगली (७), यवतमाळ (५), जिल्हा नमूद न केलेले उमेदवार (६), वाशीम (६), मुंबई (५) सातारा (२), नेरूळ (१), गोंदिया (१), नंदुरबार (११), बुलडाणा (९), रत्नागिरी (१), अमरावती (७), उस्मानाबाद (२), भंडारा (३) अशी एकूण ३२७ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबत अधिक बोलताना महापौर म्हणाल्या की, या नियुक्ती प्रक्रियेत कोणते निकष लावले, हे मला माहीत नाही. परंतु, ५० टक्के स्थानिक मुलांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. इतर मनपामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जाते. परंतु, ही नियुक्ती पाहता बाहेरील राज्यांतील मुलांची संख्या अधिक आहे. या पदावर भरण्यात आलेल्या मुलांना नीट मराठी बोलता येत नाही. बाहेरील जिल्ह्यातील मनपामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जाते, मग इथल्या महापालिकेत का दिले नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, त्यांनी या भरतीसाठी झालेल्या आॅनलाइन परीक्षेच्या फी वरदेखील हरकत घेतली आहे. इतर महापालिका १५० रुपये फी आकारत असताना ठाणे महापालिकेने ८५० रुपये फी का आकारली? भरती प्रक्रियेचे आॅनलाइन काम हे खाजगी संस्थेकडे का दिले? ठाणे महापालिकेत तितके सक्षम अधिकारी, कर्मचारी नाहीत का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहे. याबाबत, त्यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.