शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

माथेरानचे रस्ते चिखलात

By admin | Updated: September 23, 2014 01:52 IST

माथेरानमधील टपाल नाका ते रिझर्व्ह बँक हॉलिडे होम या मुख्य रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे

मुकुंद रांजणे, माथेरानमाथेरानमधील टपाल नाका ते रिझर्व्ह बँक हॉलिडे होम या मुख्य रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. रस्त्यात चिखल की चिखलात रस्ता अशी दयनीय अवस्था झाल्यामुळे नगरपरिषदेचे एकूण दीड कोटी चिखलात गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मुख्य रस्त्यावरून बाराही महिने पर्यटकांची तसेच घोडा, हातरिक्षांची वर्दळ सुरू असते.पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असलेले माथेरान जगभरातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. हा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत होता. त्यामुळे नगरपरिषदेने २०१३ मध्ये पावसाळ्यात ठेकेदाराला सदर रस्त्याचे काम दिले होते. हा रस्ता पेव्हर ब्लॉकच्या बनविणेकामी निविदा मागविल्यानंतर मंजूर निविदाधारकांकडून रस्त्याचे काम चालू केले होते. मूळ अंदाजपत्रकामध्ये पेव्हर ब्लॉकची तरतूद होती. मात्र सनियंत्रण समितीने दिलेल्या निर्देशानुसार पेव्हरब्लॉकऐवजी ट्रेडीशनल मटेरियल वापरून डब्लूबीएम रस्त्याचे काम सुरू केले. पाचशे पन्नास मीटर लांबीच्या या रस्त्याची अंदाजपत्रकीय रक्कम १,४९,७६,४२० इतकी होती. ठेकेदारास २०१४ अखेरपर्यंत १,२०,३२,२९४ रु. इतके बिल अदा केले होते. त्यानंतर त्याचे सर्व बिलांची उर्वरित रक्कम जुलै अखेरपर्यंत अदा केल्याचे समजते. रस्त्याचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे उर्वरित बिलांची रक्कम अदा केली नसल्याचे नगरपरिषदेने सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांना माहितीच्या अधिकाराखाली जून महिन्यात दिलेल्या अर्जावर उत्तर दिले होते.माथेरान पर्यावरणाला बाधा येवू नये, यासाठी इथे उत्खनन करण्याची परवानगी नाही. त्याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्बंध घातलेले आहेत. ठेकेदाराने झाडांलगतचे दगड मातीचे उत्खनन करून रस्ता बनविल्यामुळे सदर परिसर खड्डेमय झाला आहे.