शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या स्वागतासाठी माथेरान सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 23:16 IST

लोकल ट्रेन बंद असल्यामुळे पर्यटक आपल्या खासगी वाहनाने माथेरानला येऊ लागले आहेत.

कर्जत : पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन माथेरान असल्यामुळे पर्यटकांचा ओघ नेहमी माथेरानकडे असतो. या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक नाताळपासूनच माथेरानमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या दिवशी पर्यटकांच्या सेवेसाठी माथेरान सज्ज झाले आहे.     

लोकल ट्रेन बंद असल्यामुळे पर्यटक आपल्या खासगी वाहनाने माथेरानला येऊ लागले आहेत. येथील पार्किंगची व्यवस्था तोकडी पडत असल्याने येथील जुम्मापट्टी येथे पर्यायी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. ख्रिसमस आणि त्याला लागून आलेला शनिवार व रविवार या तीन दिवसात पर्यटक फार मोठ्या प्रमाणात माथेरानमध्ये दाखल झाले होते. या तीन दिवसात १५ हजार १०८ पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे या वर्षाच्या शेवटच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरानमध्ये येतील, असा विश्वास येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.

सर्व दुकाने, रेस्टॉरंट व हॉटेल्स सजली असून पर्यटकांना सेवा देत आहेत. मिनीट्रेनकडे पर्यटकांचा वाढता कल पाहता मध्य रेल्वेनेही अप-डाऊन मार्गावर दोन फेऱ्यांची वाढ केली आहे. नगरपालिकेने प्रवेशद्वार दस्तुरीवर ऑक्सिमीटर आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था केली आहे. हॉटेलचे रूम्स सॅनिटाईझ केले जात आहेत. हॉटेलमध्ये आल्यानंतर पर्यटकांची ऑक्सिमीटरने तपासणी केली जात आहे. हॉटेलची सजावट करण्यात येत आहे. अनेक प्रकारचे मनोरंजन करण्याच्या तयारी सुरू झाल्या आहेत. 

टॅग्स :Karjatकर्जत