शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुल-बाळ होत नसल्याने सासरच्या मंडळीकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:55 IST

दर्शना योगेश पाटील (२३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आ

भिवंडी : लग्नाला चार वर्षे उलटूनही मूलबाळ नसल्याने विवाहितेचा सासरच्यांकडून छळ सुरू होता. या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी नारपोली पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दर्शना योगेश पाटील (२३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. मृत दर्शना हिचे (रा. कोनगाव) हिचे १२ एप्रिल २०१६ मध्ये अलीमघर येथील योगेश पाटील याच्याशी विवाह झाला होता. दोन वर्षे सुखाचा संसार केला. मात्र, दर्शनाला मूलबाळ होत नसल्याने तिचा तिचा पती योगेश, सासरा रवींद्र आणि सासू जया यांच्याकडून शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. अखेर, तिने टोकाचे पाऊ ल उचलत घरात कुणी नसताना ती १८ डिसेंबरला विष प्यायली. पती घरी आल्यावर त्याला दर्शना बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली.त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने तिला कळव्याच्या शिवाजी रु ग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्या