शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

मार्केट लांब असल्याने बेकायदा फेरीवाल्यांचे फावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 03:03 IST

मुंबई, ठाणे या शहरांच्या आजूबाजूला फेरीवाल्यांच्या मुद्यावर चांगलीच चर्चा होत आहे

मुंबई, ठाणे या शहरांच्या आजूबाजूला फेरीवाल्यांच्या मुद्यावर चांगलीच चर्चा होत आहे. मुंब्रा शहरात एकच जे अधिकृत सुमारे ३७२ गाळ्यांचे मार्केट आहे, तेही शहरापासून तीन-चार किलोमीटर अंतरावर उभारले आहे. तसेच तेथे सुखसोयी नसल्याने ते उद्घाटनापासूनच बंद आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचे चांगलेच फावले आहे. त्यातच, पूर्वीपासून रेल्वेस्थानकाच्या अवघ्या काही अंतरावरच जुने पण बेकायदा मार्केट आहे. त्याचबरोबर अमृतनगर येथील गुलाब पार्क येथे रस्त्यावर अशा प्रकारे बेकायदा मार्केट सुरू आहे. या दोन्ही मार्केटमुळे रस्त्यांवरून चालणे म्हणजे जोखमीचे होऊन बसते. त्यातच गुलाब पार्क मार्केटमधील फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई केली जात असली, तरी फेरीवाले पुन्हा आपले बस्तान तेथे मांडत असल्याने ते मार्केट अद्यापही सुरू आहे.पावसाळा आल्यावर मुंब्य्रात नेहमीच नालेसफाई होत नसल्याचा आरोप होतो. हे जरी खरे असले तरी, त्याला स्थानिक नागरिकही तितकेच जबाबदार आहे. कारण, शहरातून वाहणाºया नाल्यांमध्ये प्रामुख्याने प्लास्टिकच्या पिशव्यांचा थरच साचलेला दिसतो. तेवढेच नाहीतर घरातील नको असलेल्या वस्तूही काही नागरिक नाल्यात फेकून देताना दिसतात. विशेष म्हणजे काही मंडळी तर राहत्या इमारतीच्या गॅलरीतून असो किंवा घराच्या उंबरठ्यावरून कचरा भिरकावून देतात. ही कचरा फेकाफेकीची सवय सोडवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. अगदी सहज कचरा भिरकावल्याने मुंब्रा शहरात जिकडेतिकडे प्रामुख्याने फिरताना प्लास्टिक पिशव्याच नजरेस पडतात. या अस्वच्छतेमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे.मुंब्रा शहर, ठाणे आणि नवी मुंबई शहरांना जोडणारे आहे. त्यातच, बायपास झाल्यानंतर, जेएनपीटीतून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक मुंब्य्रातून होते. तर, मुंब्य्रातील मुख्य असलेला रस्ता हा पूर्णपणे काँक्रिटचा असल्याने सद्य:स्थितीत तो बºयापैकी चांगला आहे. विशेष म्हणजे तो रस्ता चारपदरी आहे. परंतु, या रस्त्यावर बेकायदा उभी केली जाणारी वाहने तसेच फेरीवाल्यांमुळे दोनपदरी रस्त्यांवरून वाहतूक सुरू आहे. तर, शहराच्या गल्लीबोळांतील छोटे रस्तेही काँक्रिटचे आहेत. मुंब्य्रात काही ठिकाणी मलनि:सारणाचे काम सुरू असल्याने आणि रेल्वेस्थानकांसमोर रस्त्याचा काही पट्टा काँक्रिटीकरणापासून राहून गेल्याने त्या रस्त्याचे काम आता हाती घेण्यात आले आहे. बायपासवर मात्र नेहमीच खड्ड्यांची रांगोळी पाहायला मिळते.शहरातून जरी चारपदरी रस्ता जात असला, तरी या मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या सोसायटीतील नागरिक, व्यापारी आपल्या गाड्या बेधडक उभ्या करतात. त्यातच, फेरीवाले तसेच रिक्षावाल्यांना वाहतुकीच्या नियमाबाबत असलेले अपुरे ज्ञान मानावे किंवा मुद्दामच अडवणूक म्हणून रस्त्यात रिक्षा उभ्या करतात. यामुळे शहरात वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. त्यातच, या कोंडीतून आणि थेट शहरातून बाहेर पडण्यासाठी या शहराशी संबंध नसलेले वाहनचालक बायपासचा वापर करताना दिसतात. वाहतूक पोलिसांनी नियम तोडणाºया वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.>पाणी खेचण्यासाठी मोटारीचा वापरमुंब्रा शहराला एमआयडीसीक डून पाणीपुरवठा होतो. आपल्याला मुबलक पाणी मिळावे, यादृष्टीने मुंब्य्रातील घराघरांत पाणी खेचण्यासाठी (मोटार) मशीन लावलेले दिसते. मोटार लावणे, हा जणू त्यांचा जन्मसिद्ध हक्कच झाला आहे.पण, ज्या वेळी विजेचा लपंडाव सुरू होतो, तेव्हा येथील नागरिकांवर पाणीपाणी करण्याची वेळ येते. प्रामुख्याने, एप्रिल-मे मध्ये ही परिस्थिती येते. त्यातच, उंचावर घरे असल्याने पाणी पुरेशा दाबाने येत नाही. त्यामुळे मशीन लावण्याशिवाय पर्याय नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे किमान पाणी मिळते, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.मध्यंतरी, वीजबिल भरण्यात पिछाडीवर असलेल्या मुंब्य्राची ओळख आता काही प्रमाणात पुसू लागली आहे. वीजदेयके देताना अव्वाच्या सव्वा बिले आकारली जाते. तसेच त्या बिलावर नादुरुस्त मीटर शिक्का मारला जातो. बिलही ग्राहकांच्या उशिरा हातात पडते.जर, बिल मीटरप्रमाणे आणि वेळेत पाठवल्यास आम्ही भरण्यास तयार आहोत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच, मुंब्य्रात वीजभरणा केंदे्रही कमी आहे. नागरिकांचे आॅनलाइन बिल भरणेही कमी आहे. वीजबिल भरणा केंद्रे कमी असण्यामागे कर्मचाºयांचा अभाव आणि तांत्रिक अडचणी असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.>शहीद स्मारकाची दुरवस्था१९७१ च्या युद्धात विजयी कामगिरी करणारा वैजयंता रणगाडा देशाचे संरक्षण करताना वीरमरण आलेल्या शहीद मेजर मनीष पितांबरे यांच्या स्मरणार्थ १९ मे २०१३ रोजी आणण्यात आला. यासाठी संघर्ष या संघटनेने पुढाकार घेतला होता. त्या स्मारकाचे उद््घाटन राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. आजूबाजूला बकालपणा आला आहे. आज या स्मारकाचे पावित्र्यही राखले जात नाही. त्यालाच रिक्षा खेटून उभ्या केल्या जातात. काही महाशयांनी तर स्मारकावर जाहिराती चिकटवून मोकळे झाले. घुशी आणि उंदरांचे ते एक घरच झाले आहे. फेरीवाल्यांनी आपले साहित्य ठेवण्यासाठी स्मारकाचा आधार घेतला आहे.भिकाºयांची संख्या अधिकधार्मिक रुढीप्रमाणे जकात देण्याची पद्धत आहे. त्यामुळे पैसे हे दानरूपात वाटप केले जाते. मुंब्य्रातील रेल्वेस्थानक असो किंवा मार्केट असो, येथे भिकारी अधिक दिसतात. त्यातच, रमजान महिन्यात तर राज्यातून शेकडो भिकारी येतात. भिकाºयांमध्ये ज्येष्ठ आणि महिलांचे प्रमाण अधिक आहे.एकच पेट्रोलपंपवाढत्या नागरिकीकरणामुळे वाहनांची संख्याही तितक्याच प्रमाणात वाढत आहे. सध्या एकमेव कौसा परिसरात पेट्रोलपंप सुरू आहे. तसेच येथे सीएनजीपंप आहे.मात्र, सीएनजीपंपाला थेट लाइन नसल्याने तितक्या प्रमाणात प्रेशर मिळत नाही. त्यामुळे सीएनजीपंपाबरोबर पेट्रोलपंपाची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.>भीतीच्याछायेखालीबायपासवरून अवजड वाहनांची वर्दळ सतत होत असते. त्यामुळे या बायपासवर अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. बहुतांश अपघातांत कंटेनर उलटल्यावर ते थेट बायपासवरून खाली कोसळतात.आठवडा किंवा १५ दिवसांनी एकतरी अपघात नित्याचा झाल्याने बायपासखाली राहणारे नागरिक नेहमी भीतीच्या छायेखाली राहतात. सुदैवाने अजून तरी अशी मोठी घटना घडलेली नाही. इतर समस्यांप्रमाणे ही समस्याही तितक्याच प्रमाणात गांभीर्यपूर्वक आहे. त्यातच बायपासवर लुटमारीचे प्रमाणही अधिक असल्याचे बोलले जात आहे.>शाळांपेक्षा मदरशांचेप्रमाण अधिकशहरात बहुसंख्य मुस्लिम लोकवस्ती आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात खाजगी शाळा वाढल्या आहेत. त्यातच मदरशांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.>घरातून कचºयाची फेकाफेकमुंब्रा शहरातून फिरताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कारण, कुठल्या घरातून कधी कचरा फेकला जाईल, हे सांगता येत नाही. नाल्यात तर घरगुती वस्तू टाकल्या जातात. या कचºयामध्ये प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण अधिक असल्याने ते नाल्यात साचते. यामुळे पावसाळ्यात नाले तुंबल्याने पाणी रस्त्यावरून वाहते. पालिका एका बाजूला नालेसफाई करत असली तरी नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, हेही यातून दिसून येते.>एकाच आरोग्य केंद्रावर मदारएकच महापालिकेचे आरोग्य केंद्र आहे. तळ आणि दोन मजली असलेल्या केंद्रात मुंब्य्रातील बरेच नागरिक आरोग्य केंद्रात जात असल्याने नेहमीच ते गर्दीचे ठिकाण ठरत आहे. या ठिकाणी नॉर्मल प्रसूती केली जाते. गुंतागुुंतीची प्रसूती असल्यास तातडीने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवले जाते. जवळपास आठ ते नऊ लाख लोकवस्तीसाठी महापालिकेचे एक आरोग्य केंद्र असल्याने खाजगी डॉक्टरांचे चांगले फावते. वाढत्या लोकसंख्येप्रमाणे आरोग्य केंद्रांची संख्या वाढली पाहिजे, अशी मागणी नागरिक करत आहेत.>जनजागृतीवर पोलिसांचा भरमुंब्य्रात अमली पदार्थाची सर्रास विक्री होत आहे. ही बाब पोलिसांच्या कारवाईने समोर आली आहे. याचदरम्यान मोठ्या प्रमाणात तरुणाई अमली पदार्थांच्या आहारी जात आहे. या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून ठाणे पोलिसांनी विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यासाठी शाळा आणि महाविद्यालयांतून जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर वाहनचोरी आणि घरफोडी या घटनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत.>अधिकृत मार्केट बकालमुंब्रा प्रभाग समिती कार्यालयाजवळ असलेल्या एकमेव अधिकृत मार्केटचे उद्घाटन २०१३ मध्ये झाले. शहरापासून एका बाजूला असलेल्या मार्केटमध्येगाळे मिळालेल्या व्यावसायिकांनी त्यानंतर काहीच महिन्यांत तेथून काढता पाय घेतला. परंतु, तेथे एकच व्यावसायिक आपले दुकान मांडून आहे. एकंदरीत सर्व गाळ्यांची मोडतोड झाली आहे. लोखंडी दरवाजेही चोरीला गेले आहेत. एका बाजूला मार्केट असल्याने तरुण मंडळी तेथे सिगारेट ओढताना

टॅग्स :hawkersफेरीवालेthaneठाणे