शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कामोठेजवळील रखडलेल्या मार्गाला ३१ मार्चची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 02:35 IST

मागील पाच वर्षांपासून सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे शहरालगत रखडलेली मार्गिका ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन या ठिकाणच्या रस्ते (बांधकाम) विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांनी ६ फेब्रुवारीला मुंबईत झालेल्या बैठकीत दिले.

पनवेल : मागील पाच वर्षांपासून सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे शहरालगत रखडलेली मार्गिका ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन या ठिकाणच्या रस्ते (बांधकाम) विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांनी ६ फेब्रुवारीलामुंबईत झालेल्या बैठकीत दिले.भाजपा आमदार प्रशांत ठाकूर, शेकाप आमदार बाळाराम पाटील यांच्या शिष्टमंडळाने जोशी यांच्या घेतलेल्या वेगवेगळ्या भेटीदरम्यान कामोठ्यातील चार मीटरच्या रखडलेल्या रस्त्यासंदर्भात जोशी यांनी, सात दिवसांत निविदा काढली जाईल. त्यानंतर १ मार्चपर्यंत वर्क आॅर्डर काढून ३१ मार्चपर्यंत हा रस्ता कार्यान्वित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. कामोठे शहराजवळ रखडलेल्या मार्गिकेमुळे अनेक अपघात झाले आहेत. चार वर्षांच्या कालावधीत २८ जणांना आपले प्राण अपघातात गमवावे लागले आहेत. या रखडलेल्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यासाठी आजवर सह्यांची मोहीम, निदर्शने, मोर्चे काढण्यात आले. ३ फेब्रुवारी रोजीदेखील कामोठ्यातील रहिवाशांनी सायन-पनवेल महामार्ग रोखून धरला होता.राज्याचे सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत कार्य व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील मल्हार महोत्सवाला आले असता, आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठेतून मुंबईकडे जाणाºया रखडलेल्या मार्गाची व्यथा त्यांच्याकडे मांडली.रस्ते (बांधकाम) विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांच्यासोबत घेतलेल्या वेगवेगळ्या बैठकीत भाजपा आमदार प्रशांत ठाकूर, शेकाप आमदार बाळाराम पाटील, आमदार पंडित पाटील, सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे, आरपीआय जिल्हाअध्यक्ष जगदीश गायकवाड, कफ संस्थेचे अध्यक्ष अरु ण भिसे, भाजपा ओबीसी सेलचे रायगड जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर, नगरसेवक प्रमोद भगत आदी उपस्थित होते.>मृत्यूच्या सापळ्यातून सुटकासायन-पनवेल महामार्गाच्या रुं दीकरणाच्या कामामुळे कामोठे शहरातून मुंबईकडे जाणाºया रस्त्याच्या दिशेने थेट जोडणी अस्तित्वात नसल्यामुळे कामोठे शहरातून येणाºया वाहनांना कळंबोली सर्कलपर्यंत जाऊन यू-टर्न घेऊन पुन्हा मुंबईकडे जावे लागत असल्यामुळे वेळ व लाखो लिटर इंधन वाया जात असून, दररोज होणाºया वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या अडचणींमुळे अपघात झाले आहेत. चार वर्षांत २८ जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तसेच नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. रस्त्याचे काम लवकर पूर्ण झाल्यास मृत्यूच्या सापळ्यातून आमची सुटका होईल, अशी भावना या ठिकाणी ये-जा करणारे नागरिक व वाहनचालक व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Mumbaiमुंबई