शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्य अनुवादित होत नसल्यामुळे सातासमुद्रापलिकडे जात नाही : मधु मंगेश कर्णिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 17:35 IST

मराठी साहित्य परिषद आयोजित एक दिवसीय कथा महोत्सवाचे मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

ठळक मुद्दे मराठी साहित्य अनुवादित होत नसल्यामुळे सातासमुद्रापलिकडे जात नाही : मधु मंगेश कर्णिकमराठी साहित्य परिषद, ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने एक दिवसीय कथा महोत्सवनविन पिढीच्या लेखकांच्या हातात हात देत आजही मधु मंगेश कर्णिक कार्यरत _ डॉ. अनंत देशमुख

ठाणे: दर्जेदार लेखन मराठी साहित्यात असूनही केवळ ते अनुवादीत न झाल्यामुळे सातासमुद्रापलिकडे जात नाही अशी खंत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी यावेळी व्यक्त केली.            मराठी साहित्य परिषद, ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने रविवारी मराठी ग्रंथ संग्रहालय येथे आयोजित केलेल्या एक दिवसीय कथा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कर्णिक उपस्थित होते. ते म्हणाले, कथा या वाड्.मय प्रकाराला मराठी साहित्य परिषदेने महोत्सवाचे स्वरुप दिले याचा आनंद आहे. कोणतीही निर्मिती हा सृजनाचा उत्सव असतो. नजरेने देखावा पाहतो आणि दृष्टी ही पलिकडचे पाहत असते. हजारो - लाखो लोकांपैकी थोड्याच लोकांना निर्मिती करावी वाटते त्यांनाच निर्मितीकार, लेखक, कवी म्हणतात. अनेक साहित्यापैकी कथा हा देखील महत्त्वाचा प्रकार आहे. कोणत्याही निर्मितीचा उत्सव करणे हा साहित्यिकाच्या हातात असतो. मी ६० वर्षात ६०० कथा लिहील्या आहेत. मी लिहू लागल्यापासून निर्मितीचा आनंद मिळत गेला. हरिभाऊ, गाडगीळ यांच्या कथांचे आकर्षण अजूनही आहे असे सांगताना ते म्हणाले मराठी कथांचा अनुवाद हा सातासमुद्रापलिकडे गेला पाहिजे. ज्येष्ठ समिक्षक डॉ. अनंत देशमुख म्हणाले की, नविन पिढीच्या लेखकांच्या हातात हात देत आजही मधु मंगेश कर्णिक कार्यरत आहेत. त्यांचे वय थकले असेल पण मन नाही. मसाप, ठाणे जिल्हा शाखेचे कार्यवाह चांगदेव काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी अध्यक्ष डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे, कार्याध्यक्ष पद्माकर शिरवाडकर उपस्थित होते. पहिल्या सत्रात मराठी कथा आणि अनुवाद या विषयावरील परिसंवादात चंद्रकांत भोंजाळ, डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे आणि निर्मोही फडके यांनी सहभाग घेतला. नवकथेचे युग संपले आहे का ? या परिसंवादात सुरेखा सबनीस, मोनिका गजेंद्रगडकर आणि किरण येले यांनी आपली मते मांडली.

टॅग्स :thaneठाणेliteratureसाहित्यcultureसांस्कृतिक