शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांना मराठी भाषेचे वावडे

By admin | Updated: May 5, 2017 05:46 IST

मीरा-भार्इंदरच्या महापौर गीता जैन या अनेकदा मराठी या राजभाषेचा वापर करत नसल्याची तक्रार सरकारी पोर्टलवर

भार्इंदर : मीरा-भार्इंदरच्या महापौर गीता जैन या अनेकदा मराठी या राजभाषेचा वापर करत नसल्याची तक्रार सरकारी पोर्टलवर मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली होती. त्यावर, पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यपालांच्या मान्यतेने राज्य सरकारी अध्यादेशातील तरतुदीनुसार भाषेचा पर्याय खुला असल्याचे उत्तर देशमुख यांना दिले आहे.शहरात संमिश्र भाषकांचे वास्तव्य असून मराठी टक्का घसरत आहे. पालिकेत ४० टक्क्यांहून अधिक अमराठी सदस्य असल्याने सभागृहात अनेकदा या सदस्यांकडून हिंदी या राष्ट्रभाषेचा वापर केला जातो. भाषावापराचा वाद देशभर सुरू असला, तरी महाराष्ट्रात मराठी या मातृभाषेला १९६४ मध्ये राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानुसार, राज्याच्या कारभारात मराठीला प्राधान्य द्यावे, असा सक्त सरकारी आदेश असतानाही त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जात असल्याचे देशमुख यांचे मत आहे. सरकारी कारभारात मराठी भाषेचा वापर प्राधान्याने करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी एकीकरण समिती करत असली, तरी राज्य सरकारच्या अनेक वेबसाइटमधून मराठीला डच्चू देण्यात आला आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेनेही मराठी भाषेच्या वापराचा ठराव महासभेत मंजूर केला आहे. मात्र, महापौर नागरिकांशी संपर्क साधताना तसेच जाहीर भाषणात अनेकदा मराठी भाषेचा वापर न करता इतर भाषेलाच प्राधान्य देत असल्याची तक्रार देशमुख यांनी ९ फेब्रुवारी रोजी सरकारी पोर्टलवर केली होती. यापुढे मराठीचा वापर केला नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी) अध्यादेशातच केले नमूदगोवर्धन देशमुख यांच्या पत्राला दिलेल्या उत्तरात राज्य सरकारच्या अध्यादेशात विशेष प्रयोजनाकरिता, विशेष परिस्थितीनुसार किंवा तांत्रिक कारणास्तव भाषावापराचा पर्याय खुला असल्याचे नमूद केले असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.